कोकणासह मध्य महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा फटका ; भात उत्पादक शेतकरी चिंतेत

ऐन भात कापणीच्या हंगामात पाऊस पडत असल्याने बळीराजा मोठ्या विवंचनेत सापडला आहे.
कोकणासह मध्य महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा फटका ; भात उत्पादक शेतकरी चिंतेत

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतीय हवामान विभागाने कोकणात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाव वर्तवला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात मंगळवारी रात्री पासून पावसाची संततधार सुरु आहे. काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतद असल्याने बळीराजा चिंताचूर झाला आहे. हातातोंडाशी आलेलं भात पीक वाया जाण्याची भीती बळीराजाला आहे. ऐन भात कापणीच्या हंगामात पाऊस पडत असल्याने बळीराजा मोठ्या विवंचनेत सापडला आहे.

आज कोकणातील सिंदुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढील तीन ते चार दिवस जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात अडकला आहे. भातशेतीला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कुडाळ सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली.

याच बरोबर कोल्हापूरच्या ग्रामीण भागात रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राधानगरीस भुदरगड तालुक्यात रिमझिम पाऊस सुरु आहे. याचा भात पिकाच्या कापणीला फटका बसत आहे. सांगलीत देखील वातावरणातील लक्षणीय बदल झाला आहे. जिल्हाभर ढगाळ वातावरणा तर, काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. पलूस भागात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु असून जत तालुक्यातील उमदी भागात देखील पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसाचं द्राक्षबागांसह अन्य पिकांवर रोगाचा धोका वाढला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in