नाताळ, नवीन वर्षासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या; कोकण रेल्वेवरून मध्य प्रदेश, छत्तीसगड गाड्या धावणार; आरक्षण सुरू

नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने कोकण रेल्वेवरून अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावरून अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि कर्नाटक या मार्गांवर धावणार असून प्रवाशांकडून विशेष भाडे आकारले जाणार आहे.

डॉ. आंबेडकरनगर-ठोकूर विशेष रेल्वे

कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या समन्वयाने मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकरनगर ते कर्नाटकातील ठोकूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे.

  • गाडी क्रमांक 09304 (डॉ. आंबेडकरनगर-ठोकूर)
    २१ आणि २८ डिसेंबर रोजी
    डॉ. आंबेडकरनगर येथून दुपारी ४.३० वाजता प्रस्थान
    तिसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता ठोकूर येथे आगमन

  • गाडी क्रमांक 09303 (ठोकूर-डॉ. आंबेडकरनगर)
    २३ आणि ३० डिसेंबर रोजी
    ठोकूर येथून पहाटे ४.४५ वाजता प्रस्थान
    दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता डॉ. आंबेडकरनगर येथे आगमन

२२ एलएचबी डबे; प्रमुख स्थानकांवर थांबा

या विशेष गाडीला २२ एलएचबी डबे असतील. ही गाडी इंदौर, देवास, उज्जैन, नागदा, रतलाम, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुरडेश्वर, भटकल, मुकांबिका रोड, बायंदूर, कुंदापूर, उडुपी, मुल्की आणि सुरतकल या स्थानकांवर थांबेल.

छत्तीसगड-गोवा विशेष रेल्वे

कोकण रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या माध्यमातून बिलासपूर (छत्तीसगड) ते मडगाव (गोवा) दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

  • गाडी क्रमांक 08241 (बिलासपूर-मडगाव एक्स्प्रेस)
    २० व २७ डिसेंबर तसेच ३ व १० जानेवारी
    दुपारी २.४५ वाजता बिलासपूरहून प्रस्थान
    तिसऱ्या दिवशी रात्री २.१५ वाजता मडगाव येथे आगमन

  • गाडी क्रमांक 08242 (मडगाव-बिलासपूर एक्स्प्रेस)
    २२ व २९ डिसेंबर तसेच ५ व १२ जानेवारी
    पहाटे ५.३० वाजता मडगावहून प्रस्थान
    दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता बिलासपूर येथे आगमन

प्रमुख थांबे आणि आरक्षण

या विशेष गाड्या भाटापारा, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी स्थानकांवर थांबतील.
मडगाव–बिलासपूर गाडीला इगतपुरी येथे अतिरिक्त थांबा असेल.

या सर्व विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in