कृष्णा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक

कृष्णा कृषी परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कृष्णा कृषी महोत्सवासाठी राज्यभरातील विविध साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले
कृष्णा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक

कराड : लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील विविध साखर कारखान्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांसह अन्य मान्यवरांनी कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवात भेट देऊन पाहणी केली. यावेळी कृष्णा कृषी महोत्सव हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

कृष्णा कृषी परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कृष्णा कृषी महोत्सवासाठी राज्यभरातील विविध साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रणाचा स्वीकार करत, आज लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, रेणा सहकारी साखर कारखाना, विलास सहकारी साखर कारखाना, जागृती शुगर्स, मारुती महाराज साखर कारखाना, ट्वेंटी वन शुगर्स साखर कारखान्यांसह लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती अशा संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक अशा एकूण ९३ मान्यवरांनी कृष्णा कृषी महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध स्टॉल्सना भेटी देऊन, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली. चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, ‘‘मांजरा परिवार हा देशातील सर्वोत्कृष्ट परिवार आहे. सहकारात जबाबदार पद्धतीने काम करणारे नेतेमंडळी या परिवारात आहेत. या परिवाराचे सर्वेसर्वा स्व. विलासराव देशमुख यांनी दीर्घकाळ राज्याचे नेतृत्व केले. त्यांनी सहकार क्षेत्रासाठी अनेक चांगले निर्णय घेतले. सध्या माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आ. अमित देशमुख आणि आ. धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्या भागात चांगले काम सुरू आहे.’’

logo
marathi.freepressjournal.in