२,१०० रुपयांचा लाभ लवकरच! मंत्री आदिती तटकरे यांचा `लाडक्या बहिणीं`ना शब्द

सभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि तातडीने अंमलबजावणीला सुरुवात झाली. सध्या २ कोटी ४७ लाख पात्र बहिणींना १५०० रुपयांचा लाभ देण्यात येतो. मात्र पात्र लाडक्या बहिणींना १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपयांचा लाभ लवकरच मिळेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
२,१०० रुपयांचा लाभ लवकरच! मंत्री आदिती तटकरे यांचा `लाडक्या बहिणीं`ना शब्द
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि तातडीने अंमलबजावणीला सुरुवात झाली. सध्या २ कोटी ४७ लाख पात्र बहिणींना १५०० रुपयांचा लाभ देण्यात येतो. मात्र पात्र लाडक्या बहिणींना १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपयांचा लाभ लवकरच मिळेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना आमिष दाखवले, त्यामुळे पात्र महिलांना १,५०० रुपयांऐवजी २१०० रुपये द्या, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावून धरली आहे. महायुतीची सत्ता स्थापन होऊन १० महिने उलटले तरी २,१०० रुपये देण्यास महायुती टाळाटाळ करत आहे, असा आरोप मविआ नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान, पात्र लाडक्या बहिणींना लवकरच २,१०० रुपये देण्यात येतील, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर २ कोटी ६२ लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले. मात्र केंद्र सरकारच्या नमो योजनेचा लाभ काही महिला घेत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच काही महिलांकडे चारचाकी वाहन असल्याचे पडताळणीत समोर आले. त्यामुळे सुमारे १० लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले, तर पाच लाख महिलांचे आधार कार्ड बँकशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सद्यस्थितीत २ कोटी ४७ लाख पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे.

‘त्यांच्या’ कागदपत्रांची पडताळणी अंतिम टप्प्यात

योजनेतील अर्जांच्या छाननी प्रक्रियेत २६ लाख अपात्र लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली आहे. हे २६ लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील आहेत. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी अंतिम टप्प्यात असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

logo
marathi.freepressjournal.in