लाडक्या बहिणींचे पैसे वसूल करणार! १४ हजार पुरुषांवर कारवाईचे सूतोवाच

लाडकी बहीण योजनेच्या पैशांवर तब्बल १४ हजार पुरुषांनी डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला असतानाच, सरकारच्या या योजनेवर चहूबाजूंनी टीका होत आहे. आता लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या य १४ हजार पुरुषांवर कारवाई करणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या पैशांवर तब्बल १४ हजार पुरुषांनी डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला असतानाच, सरकारच्या या योजनेवर चहूबाजूंनी टीका होत आहे. आता लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या य १४ हजार पुरुषांवर कारवाई करणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अजित पवार म्हणाले, "या महिन्यातील लाडक्या बहिणीचे पैसे रिलीज केले आहेत. चांगल्या उद्देशाने ही योजना तयार केली होती. या योजनेत पुरुष लोकांचे नाव येण्याचे कारण नाही. जर आले असतील, तर ही योजना पुरुषांची नाही. ती दुरुस्ती करताना नावे चुकले असतील. जर पुरुषांनी पैसे घेतले असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले जातील."

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेचा लाभ तब्बल १४,२९८ पुरुषांनी घेतला. त्यांना २१.४४ कोटी रुपये वाटण्यात आले. ऑगस्ट २०२४ पासून ही योजना सुरू झाली. योजनेत लाभार्थ्यांची छाननी करताना हा प्रकार उघडकीस आला. सार्वजनिक वितरण प्रणालीतील डेटा तपासल्यावर आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या. २ लाख ३६ हजार १४ लाभार्थ्यांच्या नावांमध्ये शंका घेण्यास वाव असून पुरुष असूनही त्यांनी महिलांच्या नावाने लाभघेतला असावा, असा संशय आहे.

logo
marathi.freepressjournal.in