
ललित पाटील ड्रग्ज केसमध्ये मुंबई पोलिसांनी खूप मोठी कामगिरी केली आहे. पोलिसांना या केसमधील मोठी माहिती मिळाली आहे. नाशिकमधील देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावादरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पात्रात ड्रग्जचा मोठा साठा मुंबई पोलिसांना आढळून आला आहे. ही माहिती पोलिसांना ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून समोर आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
ललित पाटीलचा साथीदार सचिन वाघ याने नाशिक कारखान्यात बनवलेलं ड्रग्ज नष्ट करण्याच्या हेतून गिरणा नदीपात्रात फेकून दिलं होतं. सचिन वाघच्या तपासात ही माहिती उघड झाल्यानंतर मुंबई पोलीस सचिन वाघसह नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मध्यरात्री अडीच वाजता देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील नदीपात्रात ताबोडतोब ही शोध मोहीम सुरू केली. पोलिसांच्या मदतीला रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंगच पथक देखील दाखलं झालं होतं.
सचिन वाघने दोन गोण्या भरलेलं सुमारे 50 किलो ड्रग्ज नदी पात्रात फेकल्याचं पोलिसांना तपासादरम्यान सांगितल्याची माहिती आहे. कॅमेराच्या माध्यमातून ड्रग्जचा शोध घेण्यात आला, मात्र पाणी साधारण 15 ते 20 फूट खोल असल्यामुळे ड्रग्जचा साठा अद्याप बाहेर काढण्याच काम सुरू आहे. तर जवळच असणाऱ्या सरस्वतीवाडी भागातून 15 किलो mdड्रग्ज हस्तगत करण्यात मुंबई पोलिसांना यश आल आहे. कोट्यवधी रुपयांच ड्रग्ज नष्ट करण्याचा प्रयत्न सचिन वाघ याने केला होता. मात्र मुबंई पोलिसांनी ताबडतोब त्याचा छडा लावला आहे.