Lalit Patil Drugs Case : पुणे पोलीस ललित पाटीलवर मोक्का लावण्याच्या तयारीत? पुणे पोलिसांच्या कारवाईवर सर्वांच लक्ष

पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळून जाण्यास ललित पाटीलला कोणी मदत केली याचा तपास पुणे पोलिसांनी सुरु केला आहे.
Lalit Patil Drugs Case : पुणे पोलीस ललित पाटीलवर मोक्का लावण्याच्या तयारीत? पुणे पोलिसांच्या कारवाईवर सर्वांच लक्ष

ड्रग्ज माफिया ललित पाटीला मुंबई पोलिसांनी नुकतंत तामिळनाडूच्या चेन्नईमधून अटक केली. आता त्याला पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळून जाण्यास कोणी मदत केली. याचा तपास पुणे पोलिसांनी सुरु केला आहे. पुणे पोलील ललित पाटीलवर मोक्का लावण्याच्या तयारीत असल्याचं देखील सांगितलं जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, २ ऑक्टोबर रोजी पुण्याच्या ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्याप्रकरणी पुणे पोलीस ललित पाटीलची कस्टडी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पाटील याच्चयावर ड्रग्ज रॅकेट चालवल्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल आहेत.

पिंपरी-चिंचवड, पुणे आणि मुंबई पोलिसांकडून हे गुन्हे दाखल केले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर ललित पाटीलवर आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मोक्का लावण्याच्या हालचाली पुणे पोलिसांकडून सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी अटक केल्यानंतर ललित पाटील याने माध्यामांसमोर आपण पळून गेलो नव्हतो तर आपल्याला पळवण्यात आलं होतं. या सर्वांची नाव सांगणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यावरुन यामागे कोणाचा हात आहे. याची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या चौकशीकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in