महिलांच्या पोषण आहारात आढळल्या अळ्या;नेमके पोषण कोणाचे? डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रशासनाला प्रश्न

शिरूर तालुक्यातील आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा गरोदर महिलेला दिल्या जाणाऱ्या शिद्यामध्ये अळ्या व सोनकीडे आढळले आहेत. आहारातील गूळ आणि काजूमध्ये किडे आढळून आले. हाच पोषण आहार गरोदर महिलांना दिल्याचे देखील समोर आले आहे. असे प्रकार सुरू असेल तर गरोदर महिलांचे आरोग्य आणि बाळाचे आरोग्यदेखील धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महिलांच्या पोषण आहारात आढळल्या अळ्या;नेमके पोषण कोणाचे? डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रशासनाला प्रश्न

पुणे : शिरूर तालुक्यातील आंबळे गावात गरोदर महिलांच्या पोषण आहारात अळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांचे लक्ष केवळ आणि केवळ निवडणुकीवर असल्यामुळे प्रशासन वाऱ्यावर सोडले आहे. नेमके पोषण कोणाचे सुरू आहे हा प्रश्न आहे, गरोदर मतांचे आणि पोटातील बाळांचे पोषण होण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या कंत्राटदारांचे पोषण सुरू आहे, अशी टीका केली.

शिरूर तालुक्यातील आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा गरोदर महिलेला दिल्या जाणाऱ्या शिद्यामध्ये अळ्या व सोनकीडे आढळले आहेत. आहारातील गूळ आणि काजूमध्ये किडे आढळून आले. हाच पोषण आहार गरोदर महिलांना दिल्याचे देखील समोर आले आहे. असे प्रकार सुरू असेल तर गरोदर महिलांचे आरोग्य आणि बाळाचे आरोग्यदेखील धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सत्ताधाऱ्यांचे लक्ष केवळ आणि केवळ निवडणुकीवर असल्यामुळे प्रशासन वाऱ्यावर सोडले आहे. नेमके पोषण कोणाचे सुरू आहे, हा प्रश्न आहे. गरोदर मातांचे आणि पोटातील बाळांचे पोषण होण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या कंत्राटदारांचे पोषण सुरू असल्याची टीका देखील डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

बाजारातून जुना माल पडलेल्या भावाने उचलून चढ्या भावाने विकायचा अशा कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील डॉ. अमोल कोल्हे यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.

बाजारातून एक्सप्राइरी डेड जवळ आलेला खराब होऊ शकणारा जुना माल खरेदी करायचा आणि तो चढ्या दराने कंत्राटातून विक्री करायचा, अशी साखळी समोर अशी साखळी निर्माण झाली आहे. त्यामुळे नेमके पोषण कोणाचे ? कंत्राटदाराचे की गरोदर माता आणि पोटातल्या बाळाचे ? असा प्रश्न, अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in