लासलगाव बाजार समितीत मक्याला दहा वर्षांतील उच्चांकी भाव; प्रतिक्विंटल ३ हजारांचा टप्पा पार!

पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्याला यंदा बाजारात सोन्यासारखा भाव मिळू लागला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याने गेल्या दहा वर्षांतील उच्चांकी दराची नोंद करत प्रतिक्विंटल ३ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे.
लासलगाव बाजार समितीत मक्याला दहा वर्षांतील उच्चांकी भाव; प्रतिक्विंटल ३ हजारांचा टप्पा पार!
Published on: 

लासलगाव : पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्याला यंदा बाजारात सोन्यासारखा भाव मिळू लागला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याने गेल्या दहा वर्षांतील उच्चांकी दराची नोंद करत प्रतिक्विंटल ३ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. मात्र, उत्पादनात घट झाल्याने वाढलेल्या बाजारभावाचा अपेक्षित फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याला जास्तीत जास्त २ हजार ३०१ रुपये, कमीत कमी ७०० रुपये, तर सरासरी १ हजार ८५१ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला होता. यंदा मात्र मक्याच्या दरात मोठी सुधारणा झाली आहे. सध्या जास्तीत जास्त ३ हजार रुपये, कमीत कमी २ हजार १०१ रुपये, तर सरासरी २ हजार ९२१ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळत आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याने गेल्या दहा वर्षांतील उच्चांकी दराची नोंद करत प्रतिक्विंटल ३ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याने गेल्या दहा वर्षांतील उच्चांकी दराची नोंद करत प्रतिक्विंटल ३ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत मक्याच्या कमाल बाजारभावात प्रतिक्विंटल ६९९ रुपयांची, तर सरासरी बाजारभावात तब्बल १ हजार ७० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांगल्या बाजारभावाची संधी निर्माण झाली असली, तरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मर्यादा येत आहेत. गेल्या दहा वर्षांतील उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने लासलगाव बाजार समितीत मक्याच्या दराची चर्चा सुरू आहे.

शेतकऱ्यांनी मका व्यवस्थित वाळवून आणि योग्य प्रतवारी करून विक्रीस आणल्यास चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल, असे बाजार समितीचे सभापती डी.के. जगताप यांनी सांगितले.

यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या प्रमुख मका उत्पादक राज्यांतील उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी बाजारात मक्याचा पुरवठा कमी झाला आहे. दुसरीकडे पोल्ट्री उद्योग तसेच इथेनॉल निर्मिती प्रकल्पांकडून मक्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीचा थेट परिणाम बाजारभावावर होत असून, त्यामुळे दरात वाढ झाली.

नंदकुमार डागा, मका खरेदीदार

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)