लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष; कृषी उत्पन्न बाजार समितीत 'शोले स्टाईल' आंदोलन; कांद्याला समांतर बाजारभाव योजनेची मागणी

कांद्याला समांतर बाजारभाव योजना तातडीने लागू करावी तसेच नाशिक जिल्ह्यातील आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीद्वारे कांदा प्रश्नांसाठी आवाज उठवावा, यासाठी लासलगाव बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढत शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) व छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले.
लासलगाव बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढत शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) व छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले.
लासलगाव बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढत शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) व छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले.
Published on

लासलगाव : कांद्याला समांतर बाजारभाव योजना तातडीने लागू करावी तसेच नाशिक जिल्ह्यातील आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीद्वारे कांदा प्रश्नांसाठी आवाज उठवावा, यासाठी लासलगाव बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढत शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) व छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. कांदा प्रश्नी जोरदार घोषणाबाजी करत शोले स्टाईल आंदोलन सुरू झाल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकी जवळ जमा होत पाठिंबा दर्शवला.

लासलगाव बाजार समिती आवारात सकाळच्या सत्रात १०२० वाहना मधून विक्रीसाठी आलेल्या कांद्याच्या लिलावास सुरुवात झाली. कांद्याला किमान ४०० रुपये जास्तीत जास्त १४०१ रुपये तर सरासरी १००० रुपये असा दर मिळाला. मात्र, अकरा वाजेपर्यंत ५५२ वाहनांमधील कांद्याचा लिलाव पूर्ण झाला असताना बहुतांश कांद्याला ६०० ते ९०० रुपयां प्रति क्विंटल दर मिळत असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना (ठाकरे)चे माजी पंचायत समिती सभापती शिवा सुराशे, संतोष पानगव्हाणे, शिवसेना (शिंदे)चे अभिजीत डुकरे, छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष गोरख संत, नवनाथ वैराळ यांनी या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. आंदोलनाची माहिती मिळताच बाजार समितीचे उपसभापती संदीप दरेकर, सचिव नरेंद्र वाढवणे, सहसचिव प्रकाश कुमावत तसेच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी नाशिक जिल्ह्यातील १५ आमदारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत विधिमंडळात लक्षवेधी मांडण्याची विनंती केली.

...तर आंदोलन आणखी तीव्र करू!

उपसभापती संदीप दरेकर सचिव नरेंद्र वाढवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी आंदोलनकर्त्याना खाली येऊन चर्चेद्वारे मार्ग काढण्याची विनंती केल्यानंतर आंदोलनकर्ते पाण्याच्या टाकी वरून खाली उतरले आणि आंदोलन स्थगित केले. मात्र, सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

लासलगाव बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढत शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) व छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले.
लासलगाव बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढत शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) व छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले.

कांदा उत्पादन खर्चात दिवसेंदिवस मोठी वाढ होत असताना कांद्याचे दरामध्ये होत असलेली घसरण आणि बाजार समितीत मिळणारे भाव अत्यंत कमी असल्याने बुधवारी कांद्याला बाजार भाव हजार रुपयांच्या आत आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले होते. त्यानंतर दोनच दिवसांत आज बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलनामुळे पुन्हा शेतकऱ्यांमध्ये असंतोष उफाळून आला.

logo
marathi.freepressjournal.in