अंतवाली सराटीत लाठीचार्ज नेमका कोणाच्या सांगण्यावरुन? माहितीच्या अधिकारात महत्वाची माहिती समोर

जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
अंतवाली सराटीत लाठीचार्ज नेमका कोणाच्या सांगण्यावरुन? माहितीच्या अधिकारात महत्वाची माहिती समोर

राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाचं पेटला आहे. जालन्यातीर अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्च झाला होता. या लाठीचार्जबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी दिली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी आंदोलकांवर जो जालन्यात लाठीचार्ज झाला त्याचे आदेश कुणी दिले होते. याची माहिती पोलिसांकडून मागवली होती. त्यावर आता जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी माहिती ही दिली आहे. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश नाहीत असं त्यात म्हटलं गेलं आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी 23 ऑगस्ट २०२३ रोजी पोलिसांकडून आंदोलनकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला होता. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर त्यावेळी जोरदार दगडफेक करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि तसा आदेश गृहमंत्रालयाकडून दिला गेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तरीही जालन्यातील घटनेवरून फडणवीसांवर अनेकांनी आरोप केले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in