विधी तीन वर्ष अभ्यासक्रम प्रवेशाला आजपासून सुरुवात

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) विधी तीन वर्ष अभ्यासक्रमाची पहिली यादी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना ११ ते १३ ऑगस्टपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे. यानंतर दुसऱ्या यादीसाठी रिक्त जागांचा तपशील १४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येईल.
विधी तीन वर्ष अभ्यासक्रम प्रवेशाला आजपासून सुरुवात
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) विधी तीन वर्ष अभ्यासक्रमाची पहिली यादी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना ११ ते १३ ऑगस्टपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे. यानंतर दुसऱ्या यादीसाठी रिक्त जागांचा तपशील १४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येईल.

सीईटी कक्षाने विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३ ते ५ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्यासाठी मुदत दिली होती. या दरम्यान ४४ हजार ५८३ विद्यार्थ्यांपैकी ४० हजार ३२३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरला होता. पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. यामध्ये १४ हजार ९८८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

रिक्त जागांचा तपशील १४ ऑगस्टला

पहिली गुणवत्ता यादी ८ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा जाहीर झाली. मात्र रक्षाबंधन व रविवार अशा दोन सलग शासकीय सुट्ट्यांमुळे विधी तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ११ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ११ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यानंतर १४ ऑगस्टला रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in