लाडकी बहीण योजनेच्या रकमेत दहापट वाढ करणार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा टोला

निवडणूक जवळ आली की, लाडकी बहीण योजनेच्या रकमेत दहापट वाढ करतील, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुतीला लगावला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग जाहीर करणार अशी शक्यता होती. मात्र लोकसभा निवडणुकीत जनतेने मतदानातून महायुतीला धक्का दिल्याने राज्यातील जनतेची महायुतीने धास्ती घेतली आहे. निवडणूक जवळ आली की, लाडकी बहीण योजनेच्या रकमेत दहापट वाढ करतील, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुतीला लगावला आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये या योजनेचे काय झाले, असा उलट सवाल दानवे यांनी महायुतीला केला.

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधीही घेतली तरी महायुतीचा पराभव निश्चित आहे. २६ नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपते, त्याआधी महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला पाहिजे. त्यामुळे निवडणूक आयोगाला त्याआधी निवडणुका घ्याव्या लागतील, असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात टाकण्यासाठी निवडणूक लांबवली जात असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला. महाराष्ट्रातील बहिणींना लाभ मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. मात्र निवडणुकीसाठी हा खटाटोप सुरू आहे. ज्या राज्यातून या योजनेला सुरुवात झाली तिथे योजनेची काय स्थिती आहे ते पाहा, असा उलट सवाल दानवे यांनी महायुतीला केला.

logo
marathi.freepressjournal.in