
उद्धव ठाकरे प्रमाणेच राज ठाकरेंबद्दलही आदर आहे त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, असा पवित्रा शिंदे गटाकडून घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे जर काही बोलले तर आम्ही जसे काही बोलत नाही. तेवढेच आदरणीय राज ठाकरेंसुद्धा आहेत, त्यांच्यामुळेच शिवसेना बळकट झाली आहे. उद्धव ठाकरेंऐवढेच प्रेम बाळासाहेबांचे राज ठाकरेंवर होते. त्यामुळे राज ठाकरेंकडे ठाकरे कुटुंबीयांच्या विचाराचा वारसा आहे.
तर दुसरीकडे विरोधकांकडून 50 खोके घेतल्यांचा आरोप होत आहे. मात्र, 50 खोके सोडा 50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
दीपक केसरकर म्हणाले?
राज ठाकरेंनी दहीहंडीबद्दल सरकारवर टीका केली होती. यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले शिवसेनेसोबत युवकांचे संघटन राज ठाकरे युवासेनेचे प्रमुख असताना आले होते. राज ठाकरे यांचे विचार बाळासाहेबांच्या विचारांसारखे आहेत. आमची पक्ष म्हणून भूमिका वेगळी असली तरी आमची खरी बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे. मात्र, राज ठाकरे हे बाळासाहेबांचे विचार सोडून काम करत नाही. मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे बाळासाहेबांचा विचाराचा वारसा चालवत आहे, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.