Satara : शेतामध्ये गवत कापत असताना बिबट्याचा महिलेवर हल्ला; पाटण तालुक्यातील घटना

थंडीमुळे महिलेने डोके व गळ्याभोवती कापड बांधल्यामुळे ती थोडक्यात बचावली. जखमी महिलेला सोडून बिबट्याने डोंगराच्या दिशेने धुम ठोकली. मालन खाशाबा भालेकर असे जखमी महिलेचे नाव आहे.
शेतामध्ये गवत कापत असताना बिबट्याचा महिलेवर हल्ला; पाटण तालुक्यातील घटना
शेतामध्ये गवत कापत असताना बिबट्याचा महिलेवर हल्ला; पाटण तालुक्यातील घटना
Published on

कराड : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यातील भालेकरवाडी (बनपुरी) येथे शेतामध्ये गवत कापत असताना बिबट्याने महिलेवर अचानक हल्ला केला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. मात्र महिलेने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या शेतातून शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने व थंडीमुळे महिलेने डोके व गळ्याभोवती कापड बांधल्यामुळे ती थोडक्यात बचावली. जखमी महिलेला सोडून बिबट्याने डोंगराच्या दिशेने धुम ठोकली. मालन खाशाबा भालेकर असे जखमी महिलेचे नाव आहे.

मालन भालेकर शेतातील गवत कापण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. थंडीमुळे संबंधित महिलेने डोक्याला व गळ्याभोवती कापडी ओढणी लपेटलेली होती. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे डाव्या हाताच्या दंडाला जखम झाली. महिलेने आरडाओरडा केल्यामुळे तसेच आजूबाजूचे शेतातून शेतकऱ्यांनी धाव घेतल्याने जखमी महिलेस सोडून बिबट्या पळून गेला. या महिलेला ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वन विभागाच्या पाटण वन परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल राजेश नलवडे, ढेबेवाडीचे वनपाल शशिकांत नागरगोजे, वनरक्षक अमृत पन्हाळे यांनी ढेबेवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची भेट घेतली.

logo
marathi.freepressjournal.in