कराडमध्ये बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला ; न्यूमोनियामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज, सखोल चौकशीची मागणी

मृत बिबट्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डिसले यांनी शवविच्छेदन केले. मृत बिबट्या हा नर जातीचा असून ६ ते ८ महिन्यांचा आहे. तसेच त्याचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कराडमध्ये बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला ; न्यूमोनियामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज, सखोल चौकशीची मागणी
Published on

कराड : कराडपासून हाकेच्या अंतरावरील वनवासवाडी, ता. कराड गावाच्या हद्दीत शनिवारी १३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास महादेव मंदिराशेजारी बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सादर मृत बछडा ताब्यात घेत त्याचे शवविच्छेदन केले असता सदर बछड्याचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे.

शनिवारी १३ रोजी सकाळी वनवासवाडी गावच्या हद्दीत महादेव मंदिराशेजारी पांडुरंग सखाराम थोरात रा. वनवासवाडी यांच्या गट क्रमांक २५०च्या शेतामध्ये बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला. याबाबत पोलीस पाटील यांनी वनविभागास माहिती दिल्यानंतर वनपाल सागर कुंभार यांनी मृत बिबट्याचा पंचनामा करून ताब्यात घेतले. त्यानंतर सदर मृत बिबट्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डिसले यांनी शवविच्छेदन केले. मृत बिबट्या हा नर जातीचा असून ६ ते ८ महिन्यांचा आहे. तसेच त्याचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

घटनास्थळी वन विभागाकडून पंचनामा व शवविच्छेदनानंतर सदर मृत बिबट्याचे दहन करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले, वनपाल सागर कुंभार, वनरक्षक सचिन खंडागळे, शितल पाटील, वनसेवक अमोल महाडिक, हणमंत मिठारे, अजय महाडिक, मंडलकर बाबा, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डिसले उपस्थित होते. वनवासवाडी डोंगर परिसरात बिबट्याचा वावर आहे यापूर्वीही मृतावस्थेत एक बिबट्या आढळून आला होता.

logo
marathi.freepressjournal.in