...तर पाकिस्तानी कलाकारांच्या तंगड्या तोडून त्यांच्याच हातात देऊ, अमेय खोपकर यांचा निर्मात्यांना इशारा

खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकारांबाबत केलेलं ट्विट सध्या चर्चेचा विषय बनत आहे
...तर पाकिस्तानी कलाकारांच्या तंगड्या तोडून त्यांच्याच हातात देऊ, अमेय खोपकर यांचा निर्मात्यांना इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाकिस्तानी खेळाडूंसह कलाकारांना मुंबईसह महाराष्ट्रात खेळण्यास तसंच काम करण्याच्या विरोधात भूमिका घेतली जाते. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून पाकिस्तानी कलाकारांवर निशाणा साधला आहे. खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकारांबाबत केलेलं ट्विट सध्या चर्चेचा विषय बनत आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, "भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरीही आम्ही विसरु शकतच नाही. म्हणूनच फक्त खेळाडूचं नाही तर पाकिस्तानी कलाकारांना देखील आमचा विरोध कायम आहे याची आठवण करुन देतोय. पाकिस्तानी कलाकार भारतीय सिनेमांमध्ये किंवा सीरिजमध्ये काम करणार असतील तर त्यांच्या तंगड्या तोडून त्यांच्याच हाता देऊ. त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित निर्मात्याची राहील." असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटला अनेकांनी लाईक केलं आहे.

अमेय खोपकर हे ट्विटकरुन अनेकदा पाकिस्तानी कलाकारांवर टिका करत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील पाकिस्तानी कलाकरांविरोधात नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. "बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आल्याचं कानावर येत आहे. म्हणूनच आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीला पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्याला भोगावे लागतील." असं ट्विट त्यांनी काही महिन्यापूर्वी केलं होतं.

अमेय खोपकर हे नेहमीच पाकिस्तानी चित्रपट असो, कलाकार असो, वा खेळाडू असो, यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत असतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in