उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत वाट बघू, पण नंतर...जरांगे भाषणात नेमकं काय म्हंटले पाहा

उद्या 12 वाजेपर्यंत वाट बघू, त्यानंतर आझाद मैदानाकडे निघणार आणि एकदा आझाद मैदानाकडे निघालो तर मागे हटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत वाट बघू, पण नंतर...जरांगे भाषणात नेमकं काय म्हंटले पाहा

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा मोर्चा आज (२६ जानेवारी) नवी मुंबईत दाखल झाला आहे. मनोज जरांगे आणि लाखो मराठा आंदोलक नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये जमलेले आहे. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. या सभेत सरकारने मान्य केलेल्या मागण्या जरांगेंनी वाचून दाखवल्या तर, ज्या मागण्यांमध्ये त्रुटी आहेत त्या सभेच्या माध्यमातून सरकार समोर त्यांनी मांडल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज संध्याकाळपर्यंत सगासोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याची मागणी केली आहे. या अध्यादेशाची उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत वाट पाहिली जाणार असल्याचे जरांगे यांनी म्हंटले आहे. उद्या १२ वाजेपर्यंत मुंबईच्या आझाद मैदानावरील उपोषणाबाबतीतला निर्णय देण्यात येणार असल्याचे ही जरांगेंनी जाहीर केलं आहे. सकाळपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याचेही जरांगे पाटील यांनी सभेअंती स्पष्ट केले. जरांगेंचा आजचा मुक्काम हा वाशी येथेच असणार असल्याचा जरांगेंनी जाहीर केले आहे. उद्या 12 वाजेपर्यंत वाट बघू, त्यानंतर आझाद मैदानाकडे निघणार आणि एकदा आझाद मैदानाकडे निघालो तर मागे हटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • मराठ्यांच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत,वंशावळी जुळल्यानंतर प्रमाणपत्र १०० टक्के मिळणारच

  • शिंदे समिती बरखास्त करायाची नाही, दोन वर्ष शिंदे समितीची मुदत वाढ करा. सरकार टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देणार आहे.

  • आंतरवली सराटी आणि महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची सरकारची तयारी, पण याबाबतचे पत्र मिळावे.

  • कोर्टाकडून आरक्षण मिळेपर्यंत मराठा मुलामुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा, सरकारने फक्त मुलींचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती प्रक्रिया राबवू नका, नोकर भरती करताना मराठ्यांसाठी जागा राखीव ठेवा.

  • नोंद सापडलेल्यांचा सर्व नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळावे, त्यासाठी शपतपत्र द्यावे,त्याची खातरजमा करावी. शपथपत्रासाठी स्टॅंपपेपर मोफत देण्यासही सरकार तयार आहे.

  • मागण्या मान्य केल्या आहेत आता शासन निर्णय काढा.

  • गणागोतातील सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश आजच काढावा. तोपर्यंत वाशीतच थांबणार.

  • शिष्टमंडळाने जे जे निर्णय दिले आहेत ते आदेश रात्रभर वाचून काढणार, वकिलांशी चर्चा करून अभ्यास करणार आहे. त्यानंतर मराठा बांधवांशी चर्चा करणार.

  • सकाळपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. फक्त पाणी पित आहे.उद्या सकाळपर्यंत अध्यादेश आल्यानंतर उपोषण सोडण्याबाबत निर्णय देणार.

    त्यानंतर, जरांगे म्हणाले की आम्ही २६ जानेवारीचा सन्मान करतो. आम्ही मुंबईत जात नाही. इथेच थांबतो. प्रशासनाचा सन्मान करतो.उद्यापर्यंत अध्यादेश काढा आम्ही एक पाऊल मागे येऊ, पण उपोषण सोडणार नाही....

logo
marathi.freepressjournal.in