निवडणूक चिन्हांचा तिढा काही सुटेना, शिंदे गटाच्या तलवार-ढाल विरुद्ध 'या' समाजाचे निवडणूक आयोगाला पत्र

हे चिन्ह निवडणूक चिन्ह म्हणून वापरू नये, अशी मागणी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजितसिंह कामठेकर यांनी केली आहे. तसंच त्यांनी निवडणूक आयोगाला निवेदन
निवडणूक चिन्हांचा तिढा काही सुटेना, शिंदे गटाच्या तलवार-ढाल विरुद्ध 'या' समाजाचे निवडणूक आयोगाला पत्र

राज्यातील राजकारण (Maharashtra) सध्या वेगळ्या वळणावर चालू आहे. सामान्य जनतेचे प्रश्न एका बाजूला राहून पक्षांतर्गत तिढा सोडवण्यातच सर्व राजकीय पक्ष व्यस्त आहेत. शिंदे गट (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) गट यांच्या चिन्हाचा निकाल आयोगाने दिला असला तरी त्याचे काहीसे वेगळे परिणाम आता उमटताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 2 तलवारी आणि ढाल चिन्हावर नांदेडच्या शीख समाजाने आक्षेप घेतला आहे. गुरुद्वारा श्री सचखंड दरबारचे माजी सचिव रणजितसिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन पाठवले आहे.

त्रिशूल हे धार्मिक चिन्ह, ढाल-तलवार हे खालसा पंथाचे धार्मिक चिन्ह असल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ते नाकारले, त्यामुळे निवडणूक आयोगाने हे चिन्ह द्यायला नको होते. याबाबत निर्णय न झाल्यास रणजित सिंग न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला आहे. शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार चिन्हावर शीख समाजाने आक्षेप घेतला आहे. खालसा समाजाच्या धार्मिक चिन्हाशी जुळणारे हे चिन्ह निवडणूक चिन्ह म्हणून वापरू नये, अशी मागणी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजितसिंह कामठेकर यांनी केली आहे. तसंच त्यांनी निवडणूक आयोगालाही निवेदन पाठवलं आहे. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in