पुणे ड्रग्ज पार्टीप्रकरणी हॉटेल रेनबोचा परवाना रद्द

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लिझर लाऊंज (एल-३) या ठिकाणी २३ जूनला मध्यरात्री ड्रग्ज व मद्य पार्टी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
पुणे ड्रग्ज पार्टीप्रकरणी हॉटेल रेनबोचा परवाना रद्द
FPJ
Published on

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लिझर लाऊंज (एल-३) या ठिकाणी २३ जूनला मध्यरात्री ड्रग्ज व मद्य पार्टी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात संबंधित ‘एल-३’ ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूसाठा जप्त केल्याने हॉटेल रेनबोचा परवाना कक्षाचा परवाना रद्द केला असून त्याला सील ठोकले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी दिली आहे.

त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. तर, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन बीट मार्शल, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस निरीक्षक यांचे निलंबन झाले असून हलगर्जीपणामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील एक निरीक्षक व एक दुय्यम निरीक्षक यांचेदेखील निलंबन करण्यात आले आहे. आता

राजपूत म्हणाले, संबंधित एल-३ हॉटेलमधील प्रकार उघडकीस आल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. सदर पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याबाबत सत्यता पडताळणी करण्यासाठी पोलिसांचा स्वतंत्र तपास सुरू असून घटनास्थळावरील सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांनी तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे. सदर हॉटेलची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना मद्यसाठा मिळून आला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण तीन लाख रुपये किमतीचे २४१ लिटर विदेशी मद्य व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सदर इमारतीतील तळमजला व पहिला मजल्यावर संतोष कामठे यांच्या नावाने हॉटेल रेनबोमध्ये मद्यविक्री परवाना कक्ष अनुज्ञप्ती मंजुरी आहे. परंतु सदर परवाना कक्षात पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी छुपा मार्ग काढून अनुज्ञप्तीच्या मंजूर नकाशात बदल केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबत सखोल निरीक्षण केले असता, या परवाना कक्षात गंभीर स्वरूपाची विसंगती आढळून आल्याने तसेच परवाना कक्षात अंतर्गत बदल केल्यामुळे सदर परवाना कक्षाचा परवाना जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार तत्काळ रद्द करून त्याला सील करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून परवाना कक्षात विसंगती नोंदविलेले एकूण ६९ अनुज्ञप्ती पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले असून त्यात संमिश्र पानावर

अमली पदार्थांचे सेवन केल्याची दोन तरुणांची कबुली

फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लिजर, लाऊंज (एल थ्री) बारमध्ये झालेल्या बेकायदा ड्रग्ज पार्टीत अमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेतलेल्या दोन तरुणांविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहा अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री तसेच परराज्यातील मद्य/अवैध ढाबे, अवैध ताडी विक्रीविरुद्ध कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण १४ नियमित पथके व एकूण तीन विशेष पथक तयार केली असून त्याद्वारे कारवाई करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in