गॅस एजन्सीकडे ई-केवायसी अन् आधार कार्ड बँकेशी लिंक करा! मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्या; अन्न व नागरी पुरवठा विभागाचे आवाहन

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षांला तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस एजन्सी कडे ई केवायसी करणे गरजेचे असून बँकेशी आधार कार्ड लिंक करा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.
गॅस एजन्सीकडे ई-केवायसी अन् आधार कार्ड बँकेशी लिंक करा! मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्या; अन्न व नागरी पुरवठा विभागाचे आवाहन
Published on

मुंबई : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षांला तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस एजन्सी कडे ई केवायसी करणे गरजेचे असून बँकेशी आधार कार्ड लिंक करा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.

स्वयंपाक करताना गॅसचा वापर केल्यास धुरामुळे होणारा त्रास कमी होईल आणि आरोग्यावर परिणाम होणार नाही. मात्र गॅस जोडणीधारकांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहचवतात. यावर उपाय करत राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील प्रधाममंत्री उज्ज्वला योजना आणि ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे. मात्र यासाठी गॅस एजन्सी कडे ई केवायसी करणे गरजेचे असून बँकेशी आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे.

logo
marathi.freepressjournal.in