दुकानाचे शटर फोडून अडीच लाखांची दारू चोरीला

गांधीनगर येथे चंद्रलोक हॉटेलच्या बाजुस असलेल्या देशी दारूचे दुकान चोरट्यांनी फोडले.
दुकानाचे शटर फोडून अडीच लाखांची दारू चोरीला

नांदेड : दुकानाचे शटरचे फोडून चोरट्यांनी अडीच लाखांवर दारूचे बाॅक्स पळवल्याची घटना घडली. बालाजीसिंह देवमनसिंह परमार यांनी पोलीसात तक्रार दिली. गांधीनगर येथे चंद्रलोक हॉटेलच्या बाजुस असलेल्या देशी दारूचे दुकान चोरट्यांनी फोडले. ३ रोजी ते नेहमी प्रमाणे त्यांचे देशी दारूचे दुकान उघडण्याकरीता आले असता त्यांचे दुकानाचे शटरचे व गोदामाचे कुलुप तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील नगदी रोख २५ हजार रुपये व २ लाख ६९ हजार ६७० रूपयाची देशी दारू असा एकुण २ लाख ९४ हजार ६७० रूपयाचा मुद्देमाल चोरटयाने चोरून नेला. या प्रकरणी बालाजीसिंह देवमनसिंह परमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in