लोकसभा निवडणुकीबाबत ९३ टक्के महिलांना जाण; महिला मतदार राजकीय सक्षमीकरण सर्व्हेचा निष्कर्ष

स्त्री आधार केंद्र, पुणे आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालय (स्वायत्त), पत्रकारिता व जन संज्ञापन विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'महिला मतदार राजकीय सक्षमीकरण आढावा' पहिला टप्प्याचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात महिला मतदारांचे सर्वेक्षण केले त्यातून मिळालेल्या विविध माहितीच्या आधारे निष्कर्ष काढण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीबाबत ९३ टक्के महिलांना जाण; महिला मतदार राजकीय सक्षमीकरण सर्व्हेचा निष्कर्ष

पुणे : निवडणूक नेमकी का घेतली जाते तर लोकप्रतिनिधी निवडणे आणि विकासकामे करण्यासाठी ही बाब महत्त्वाची असल्याचे महिलांना जाणवते. लोकशाही जिवंत राहण्यासाठी निवडणूक होणे आवश्यक असल्याचेही त्यांचे मत आहे. महिलांना राजकारणात स्वतंत्र काम करण्यास वाव, स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार हवा आहे, ईव्हीएम द्वारे पारदर्शक निवडणूक पार पडाव्यात, असे महिला मतदार राजकीय सक्षमीकरण सर्व्हेमध्ये आढळून आले आहे. लोकसभा निवडणुकीबाबत ९३ टक्के महिलांना जाण असल्याचेही यात दिसून आले.

स्त्री आधार केंद्र, पुणे आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालय (स्वायत्त), पत्रकारिता व जन संज्ञापन विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'महिला मतदार राजकीय सक्षमीकरण आढावा' पहिला टप्प्याचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात महिला मतदारांचे सर्वेक्षण केले त्यातून मिळालेल्या विविध माहितीच्या आधारे निष्कर्ष काढण्यात आला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती आणि अध्यक्षा स्त्री आधार केंद्र डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील २०० महिला मतदारांचे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यातील निष्कर्ष अलीकडेच एका पत्रकार परिषदेत मांडण्यात आले. यावेळी गरवारे महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचे प्रा. संयोग इंगळे, स्त्री आधार केंद्राच्या अनिता शिंदे, विभावरी कांबळे आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या सर्वेक्षणाबाबत माहिती देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, महिलांना वेगवेगळ्या समस्या जाणवत आहेत. हुंडा, अत्याचाराबद्दलही स्त्रिया जागरूक असल्याचे यात आढळून आले. त्यांनी काहीं अपेक्षा व्यक्त केल्या आहे. निवडणूक नेमकी का घेतली जाते तर लोकप्रतिनिधी निवडणे आणि विकासकामे करण्यासाठी ही बाब महत्त्वाची असल्याचे त्यांना जाणवते. लोकशाही जिवंत राहण्यासाठी निवडणूक होणे आवश्यक असल्याचे त्यांना वाटत आहे. डॉ गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, एप्रिल अखेरीस पुन्हा एकदा असे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in