Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत किती टक्के मतदान? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

Maharashtra Voting: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत किती टक्के मतदान? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी
@ANI

Voting Percentage: देशासह महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यासाठी आज, २० मे रोजी मतदान सुरू आहे. देशभरात ४९ आणि महाराष्ट्रात १३ जागांसाठी मतदान होत आहे. राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या मतदारसंघात मदान सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांसह अनेक नेते, राजकारणी ते सेलिब्रिटींनी आपला मतदान हक्क बजावला आहे. दरम्यान राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ४८.६६ टक्के मतदान

 • भिवंडी-४८.८९

 • धुळे-४८.८१

 • दिंडोरी-५७.०६

 • कल्याण-४१.७०

 • मुंबई उत्तर-४६.९१

 • मुंबई उत्तर मध्य-४७.३२

 • मुंबई उत्तर पूर्व-४८.६७

 • मुंबई उत्तर पश्चिम-४९.७९

 • मुंबई दक्षिण-४४.२२

 • मुंबई दक्षिण मध्य-४८.२६

 • नाशिक-५१.१६

 • पालघर-५४.३२

 • ठाणे-४५.३८

मतदान सकाळी ७ वाजता सुरू झाले असून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, जोपर्यंत रांगेतील शेवटचा व्यक्तीचे मतदान होणार नाही, तोपर्यंत मतदान सुरू राहणार आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आयोगाच्या माहितीनुसार, ४.६९ कोटी पुरुष, ४.२६ कोटी महिला आणि ५ हजार ९ तृतीयपथी मतदार असे मिळून ८.९५ कोटी मतदार पाचव्या टप्प्यातील ६९५ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे.

पाचव्या टप्प्यातील 'या' आहेत महत्त्वाच्या लढती

देशात पाचव्या टप्प्यात पाचव्या टप्प्यात रायबरेलीतून राहुल गांधी, अमेठीतून स्मृती इराणी, मुंबई उत्तरतून पियूष गोयल, मुंबई उत्तर मध्यमध्ये उज्ज्वल निकम, कैसरगंजमधून बृजभूषण सिंग, एलजेपी (रामविलास) प्रमुख चिराग पासवान, जेकेएनसी प्रमुख ओमर अब्दुल्ला आणि आरजेडी नेत्या रोहिणी आचार्य आदी नेत्यांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे.

मतदान केंद्रांवर चोवीस तास लक्ष

मतदान शांतते होण्यासाठी एकूण २ हजार भरारी पथक, २ हजार १०५ स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम, ८८१ व्हिडीओ सर्व्हिलन्स टीम आणि ५०२ व्हिडीओ व्यूइंग टीम ९४ हजार ७३२ मतदान केंद्रांवर चोवीस तास लक्ष ठेवून आहेत.

logo
marathi.freepressjournal.in