Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत किती टक्के मतदान? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, माजी मंत्री पंकजा मुंडे, शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि अहमदनगर विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे. सर्वाधिक ४१ उमेदवार बीड मतदारसंघात असून, सर्वात कमी ११ उमेदवार...
Lok Sabha Elections 2024
Lok Sabha Elections 2024

मुंबई : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज, १३ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. देशात ९६ मतदारसंघात आणि राज्यातील ११ मतदारसंघात मतदान होत आहे. राज्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर अहमदनगर, शिर्डी आणि बीड या मतदासंघांत मतदान सुरू असून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, माजी मंत्री पंकजा मुंडे, शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि अहमदनगरचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत राज्यातील ११ मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले.

कोणत्या मतदारसंघात किती मतदान झाले?

राज्यात दुपारी ५ वाजेपर्यंत कुठे, किती मतदान?

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले.

  • नंदुरबार - ६०.६०

  • जळगाव - ५१.९८

  • रावेर - ५५.३६

  • जालना - ५८.८५

  • औरंगाबाद - ५४.०२

  • मावळ - ४६.०३

  • पुणे - ४४.९०

  • शिरूर - ४३.८९

  • अहमदनगर - ५३.२७

  • शिर्डी - ५२.२७

  • बीड - ५८.२१

११ मतदारसंघात एकूण मतदार आणि उमेदवार किती?

राज्यातील मतदानाच्या चौथ्या टप्प्यात ११ मतदारसंघात एकूण २ कोटी २८ लाख १ हजार १५१ मतदार मतदानास पात्र आहेत. या ११ मतदारसंघापैकी मावळमध्ये सर्वाधिक म्हणजे २५ लाख ८५ हजार १८ मतदार मतदानास पात्र आहेत. तर सर्वात कमी मतदार शिर्डीत असून त्यांची संख्या १६ लाख ७७ हजार ३३५ इतकी आहे. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ लोकसभा मतदारसंघात २९ हजार २८४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या ११ मतदारसंघात एकूण २९८ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. सर्वाधिक ४१ उमेदवार बीड मतदारसंघात असून, सर्वात कमी ११ उमेदवार नंदुरबार मतदारसंघात आहेत. सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले होते.

राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत कुठे, किती मतदान?

  • नंदुरबार - २२.१२

  • जळगाव- १६.८९

  • रावेर - १९.०३

  • जालना - २१.३५

  • औरंगाबाद - १९.५३

  • मावळ -१४.८७

  • पुणे - १६.१६

  • शिरूर - १४.५१

  • अहमदनगर - १४.७४

  • शिर्डी -१८.९१

  • बीड - १६.६२

राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत कुठे, किती मतदान?

  • जळगाव- ६.१४

  • जालना - ६.८८

  • नंदुरबार - ८.४३

  • शिरूर- ४.९७

  • अहमदनगर - ५.१३

  • औरंगाबाद - ७.५२

  • बीड - ६.७२

  • मावळ -५.३८

  • पुणे - ६.६१

  • रावेर - ७.१४

  • शिर्डी -६.८३

logo
marathi.freepressjournal.in