अरूंद जागेमुळे लांबीच्या बसेसना अडथळा

पोलादपूर येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अंडरपास गेल्यानंतर त्यावरून पुर्वेकडील सर्व्हिसरोडवरून पश्चिमेकडील सर्व्हिसरोडपर्यंत तब्बल पाच व्हेईक्युलर ब्रिजेस बांधण्यात आले
अरूंद जागेमुळे लांबीच्या बसेसना अडथळा

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ पोलादपूर बसस्थानकासमोर अंडरपास बॉक्स कटिंग पद्धतीने जमिनीखालून नेण्यात आला आहे. याठिकाणी पोलादपूर एसटी बसस्थानक हे पूर्वीच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ लगत आहे. या एसटी बसस्थानकापर्यंत येण्यासाठी पश्चिमेकडून पूर्वेच्या सर्व्हिस रोड अरूंद असल्याने जादा लांबीच्या बसेसना अडथळा होत आहे.

पोलादपूर येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अंडरपास गेल्यानंतर त्यावरून पुर्वेकडील सर्व्हिसरोडवरून पश्चिमेकडील सर्व्हिसरोडपर्यंत तब्बल पाच व्हेईक्युलर ब्रिजेस बांधण्यात आले आहेत. यामुळे दोन्हीकडील वाहन व पादचाऱ्यांना ये-जा करणे सुकर व्हावे असा हेतू आहे. मात्र, पश्चिमेकडील सर्व्हिसरोड खुपच अरूंद असल्याने महाबळेश्वर अथवा रत्नागिरीकडून येणाऱ्या पुर्ण लांबीच्या हिरकणी, शिवनेरी तसेच अन्य बसेसना पुलावरून पूर्वेकडे वळताना अरूंद रस्त्याचा फारच अडथळा होत असतो. पश्चिमेकडील सर्व्हिस रोडवर दारूची दुकाने परमिटरूम, बियरबार अशी दुकाने असल्याने याठिकाणाहून मद्यप्राशन करून व्हेईक्युलर ब्रिज आणि पश्चिम तसेच पूर्वेकडील सर्व्हिसरोडवर आलेल्या देशाच्या अर्थशक्तीला प्रोत्साहन देणाऱ्यांना चुकवित वाहनांचे मार्गक्रमण करण्याची कसोटी वाहनचालकांवर जिकिरीची ठरत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in