Madha Constituency : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माढ्यात ३० एप्रिलला जाहीर सभा

पंतप्रधान मोदींची सभा माळशिरस येथे होणार असून या सभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यासारखे दिग्गज नेते देखील उपस्थित असणार आहे.
Madha Constituency : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माढ्यात ३० एप्रिलला जाहीर सभा

मुंबई : माढा लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ३० एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. या मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. माढामध्ये पुन्हा भाजपचे वर्चस्व राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात उतरले आहे. या मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

पंतप्रधान मोदींची सभा माळशिरस येथे होणार असून या सभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यासारखे दिग्गज नेते देखील उपस्थित असणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोहित पाटील यांच्या प्रचारासाठी बुधवारी (२४ एप्रिल) जाहीर सभा देखील घेतली होती. या सभेतून शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचे महागाईवर भाषण केल्याचा जुना व्हिडीओ दाखविला होता. त्यावेळी मोदींनी महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. आता दहा वर्षापासून मोदींच्या हाता देशाची सत्तात असूनही महागाई कमी झालेली नाही, अशी टीका शरद पवार यांनी जाहीर सभेतून केली.

पंतप्रधानांच्या सभेची अशी आहे तयारी

पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी माळशिरस येथील कृषी विभागाच्या जागेची पाहणी करण्याचे काम सुरू असून ही एकूण ६० एकरापेक्षा मोठी जागा असणारे मैदान आहे. या मैदानाच्या २८ एकर जागेवर मोदींची सभा होणार असून बाकीच्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in