महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार - उपमुख्यमंत्री शिंदे; महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाला सुरुवात

कराड : महाबळेश्वर येथे आयोजित पर्यटन उत्सवाचे अत्यंत सुंदर, आटोपशीर व नेटके आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवाला साजेसे असे आयोजन असून या महोत्सवामुळे पर्यटन वाढीला निश्चितपणे चालना मिळेल व या पर्यटन उत्सवामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार - उपमुख्यमंत्री शिंदे; महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाला सुरुवात
छायाचित्र सौ. - Rambhau Janardhan Jagtap
Published on

कराड : महाबळेश्वर येथे आयोजित पर्यटन उत्सवाचे अत्यंत सुंदर, आटोपशीर व नेटके आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवाला साजेसे असे आयोजन असून या महोत्सवामुळे पर्यटन वाढीला निश्चितपणे चालना मिळेल व या पर्यटन उत्सवामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे २ ते ४ मे या कालावधीत महापर्यटन उत्सव महाबळेश्वरचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.

महाबळेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमि आहे. याला ऐतिहासिक वारसा आहे, असे सांगून उपमुख्यंत्री शिंदे म्हणाले, महाबळेश्वरच्या इतिहासात पहिल्यांदाच असा महापर्यटन उत्सव होत आहे. राज्याचा पर्यटन विभाग हा अत्यंत उत्साही असून अतिशय कमी दिवसात या महोत्सवाची केलेली तयारी अत्यंत दर्जेदार आहे. महापर्यटन उत्सवात विविधसाहसी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ले आणि शस्त्रप्रदर्शनी, फूड फेस्टिव्हल, साहसी खेळांचे उपक्रम, हेलिकॉप्टर यासह विवविध उपक्रम पर्यटकांसाठी राबविण्यात येत आहेत. फूड फेस्टिवलमध्ये विविध चवदार पदार्थ, मिलेटचे पदार्थ, औषधी पदार्थ यांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढेल. सातारा जिल्ह्याला पर्यटन हब बनविण्यासाठी जाणीवपूर्वक अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत. बामणोली खोऱ्यात केबल पुल बांधण्यात येत आहे. त्यावर विव्हिंग गॅलरी, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पुल, तापोळा तेटली येथे होणारा पुल या सर्वांमुळे पर्यटन वाढीला मदत होणार आहे.

लोकाभिमुख, कल्याणकारी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. यावेळी त्यांनी अनेक राज्ये पर्यटन उद्योगावर चालतात, आपल्याकडेही पर्यटनाला खूप वाव आहे. त्याची व्याप्ती अधिक वाढविल्यास पर्यटनाला चालना मिळेल, आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून महाबळेश्वरचे नाव जगभरात चमकले पाहिजे यासाठी काम करा, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पर्यटन सुरक्षा दल उपक्रम राज्यभर राबविणार

पर्यटन तथा पालकमंत्री देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्याचे ब्रॅन्डींग जगभरात करण्यासाठी या महापर्यटन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोसत्वाच्या आयोजनासाठी जिल्ह्यातील मंत्री महोदयांनी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे. प्रायोगिक तत्वावर महाबळेश्वर येथे सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाची उपयुक्तता लक्षात घेऊन येत्या काळात पर्यटन सुरक्षा दल उपक्रम राज्यभर राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

२८ स्टॉलधारकांचा जलसमाधीचा इशारा

महाबळेश्वरच्या महापर्यटन महोत्सवास दिमाखात सुरुवातही झाली आहे तर या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवासाठी २० कोटी रुपयांची तरतूद शासनाकडे प्रस्तावित आहे. यामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले नसल्याने २८ स्टॉलधारकांनी जलसमाधीचा इशारा दिला आहे.

महाबळेश्वर महापर्यटन राबवण्यात येत असताना महाबळेश्वरच्या पर्यटन हंगामात पर्यटकांना आकर्षित करून घेतले जात आहे. असे असताना पर्यटन संचालनालयाकडून घेण्यात आलेले विविध कार्यक्रमात स्थानिकांना सामावून न घेता एका खासगी कपंनीला महापर्यटन महोत्सवाचा ठेका दिला गेला आहे.

महाबळेश्वरच्या ऐतिहासिक पर्यटनाला याबाबत समोर ठेऊन घेण्यात आलेले विविध कार्यक्रम खासगी कंपनीच्या माध्यमातून पार पाडले जाणार असल्याची चर्चा आहे.

त्यात २८ स्टॉलधारकांनी जलसमाधीचे दिलेले अल्टिमेटम यावरून लपून राहिले नाही. महाबळेश्वर शहरात जास्त भूखंडावर विविध प्रशासकीय विभागाचा मालकी हक्क आहे.मात्र यामध्ये स्थानिकांना काहीच कोठेच थारा देण्यात आलेला नाही.

logo
marathi.freepressjournal.in