महाडच्या जळीत कंपनीला उत्पादन थांबविण्याचे आदेश

कंपनीने उत्पादन थांबवावे आणि ज्वलनशील रासायनिक माल, घटक तेथून बाजूला करावेत, असे आदेश या संबंधात स्थानिक प्रशासनाने दिले आहेत.
महाडच्या जळीत कंपनीला उत्पादन थांबविण्याचे आदेश

अलिबाग : महाडच्या औद्योगिक वसाहतीत आग दुर्घटनाग्रस्त फार्मास्युटिकल कंपनी ब्लू जेट हेल्थकेअरला उत्पादन थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ३ नोव्हेंबर रोजी या कंपनीच्या फॅक्टरीत लागलेल्या आगीमध्ये ११ कामगार जळून मरण पावले होते.

कंपनीने उत्पादन थांबवावे आणि ज्वलनशील रासायनिक माल, घटक तेथून बाजूला करावेत, असे आदेश या संबंधात स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रायगड विभागाने केलेल्या शिफारशीनंतर हे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. ७२ तासांचा कालावधी यासाठी देण्यात आला आहे. उप जिल्हाधिकारी (महाड) जे. एस. हजारे यांनी या संबंधात नोटीस बजावली आहे. त्याचप्रमाणे सानिका केमिकल व व्ही. एन. क्रिएटिव्ह या कंपन्यानाही उत्पादन थआंबविण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या उत्पादनामुळे जलप्रदूषण होत असून मोठ्या प्रमाणात मासे मरत असल्याचे सांगण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in