Raigad : कंपनीतील वायू गळतीने महाडमध्ये दोघांचा बळी

महाड एमआयडीसीतील इंडो अमाईन्स या रसायन कंपनीत शनिवारी संध्याकाळी झालेल्या वायू गळतीत रविवारी आणखी एक बळी गेला आहे.
कंपनीतील वायू गळतीने महाडमध्ये दोघांचा बळी
कंपनीतील वायू गळतीने महाडमध्ये दोघांचा बळी
Published on

महाड : महाड एमआयडीसीतील इंडो अमाईन्स या रसायन कंपनीत शनिवारी संध्याकाळी झालेल्या वायू गळतीत रविवारी आणखी एक बळी गेला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता २ वर पोहोचला आहे.

या कंपनीतील कामगाराचा शनिवारीच मृत्यू झाला होता. त्यानंतर कंपनीच्या समोरील विरल कंपनीत काम करणाऱ्या कल्पेश वांद्रे यांचा मुंबईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वायू गळतीचा फटका समोरील विरल कंपनीतील जवळपास ३० ते ३५ कामगारांना बसला. त्यापैकी कल्पेश वांद्रे यांची प्रकृती सर्वात गंभीर होती. याच रस्त्याने प्रवास करणाऱ्या एका तरुणीला वायूचा त्रास झाला. ती सध्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in