
सर्वच पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणूकांची तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज (१८ जुलै) रोजी दिल्लीत एनडीए ची एक महत्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली आहे. या बैठकीत एनडीएचे ३८ घटक पक्ष सामील होणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या काही मित्रपक्षांना या बैठकीतून वगळण्यात आलं आहे.
आज होणाऱ्या एनडीए च्या महत्वात्या बैठकीचं नियोजन न गेल्याने भाजपाच्या मित्रपक्षांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. भाजपने दिलेली वागणूकीमुळे आम्ही स्वत:च्या पायावर उभं राहालया शिकलो असल्याचं जानकर यांनी म्हटलं आहे. तर आम्ही कोणाकडे भीक मागायला जाणार नाही, आता प्रत्येक जागा आम्ही लढणार, असं महादेव जानकर म्हणाले आहेत.
या विषयावर बोलताना ते म्हणाले की, भाजपला वाटत आमची त्यांना गरज नाही. त्यामुळे आम्ही कशाला भीक मागायला जाऊ की आम्हाला बोलवा. असं काही करायची गरज नाही. आम्ही महाराष्ट्रात जनसुराज्य रात्रा काढली आहे. आमचा पक्ष कसा वाढेल याचा आम्ही प्रयत्न करु. हा पक्ष मोठा होईल, अशी त्यांना भीती असेल म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं नसेल. आमचे आमदार-खासदार होतील तेव्हा ते आम्हाला बोलावतील. आम्ही शहाणे झालो असून ५३४ जागा लढवणार असल्याचं जानकर म्हणाले.