महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी नावे समोर येण्याची शक्यता! मनोज जरांगे पाटील यांचा दावा

परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात अशी काही धक्कादायक नावे पुढे येतील की संपूर्ण परळी हादरून जाईल, असा दावा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला. तपास अंतिम टप्प्यात असून अहवाल न्यायालयासमोर सादर झाल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असेही त्यांनी नमूद केले.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी नावे समोर येण्याची शक्यता! मनोज जरांगे पाटील यांचा दावा
महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी नावे समोर येण्याची शक्यता! मनोज जरांगे पाटील यांचा दावा
Published on

बीड : परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात अशी काही धक्कादायक नावे पुढे येतील की संपूर्ण परळी हादरून जाईल, असा दावा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला. तपास अंतिम टप्प्यात असून अहवाल न्यायालयासमोर सादर झाल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असेही त्यांनी नमूद केले.

मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे पत्रकारांशी संवाद साधताना खळबळजनक दावे केले आहेत. ते म्हणाले, ही कायदेशीर प्रक्रिया आहे. अहवाल आल्यानंतर तो न्यायालयात मांडला जाईल आणि त्यानंतर पोलिस काही नावे जाहीर करतील. मलाही काही नावे माहिती आहेत; परंतु तपासात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मी ती नावे सध्या सांगणार नाही. मोठी आणि प्रभावशाली नावे समोर येण्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे परळीमध्ये राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चांना उधाण आले आहे.

महादेव मुंडे यांच्या मृत्यूनंतर सुरुवातीपासूनच या प्रकरणात राजकीय लागेबांधे असल्याची चर्चा होती. कुटुंबीयांनी सातत्याने निष्पक्ष तपासाची मागणी केली होती. मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने विशेष तपास पथक स्थापन केले होते. आता नार्को आणि मेंदू नकाशा चाचण्यांचे अहवाल तपास यंत्रणेकडे आल्यामुळे सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात स्वतः लक्ष घातल्याचे सांगितले जात असून तपास वेगाने पुढे नेला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in