
कराड : कोल्हापूर येथील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये नेण्यात आले. या हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर व कोल्हापूरकरांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी कराडमध्येही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. येथील दत्त चौकात महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कराडकरही एकवटले. चौकातील फलकावर कोल्हापूरकरांच्या पाठिंबा व्यक्त केला. मागणीला कराडकरांनी स्वाक्षरी करून नांदणी (कोल्हापूर) मठातील महादेवी हत्तीणीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप 'पेटा'ने केला. प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. यानंतर समितीने प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवले होते. याविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्यावतीने हत्तीणीबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, मात्र महादेवी सदर याचिकाही सुप्रीम कोर्टाने फेटाळली. त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्तीण वनताराकडे सोपवण्यात आली.
देखील गेल्या ३५ वर्षापासून महादेवी आणि कोल्हापूरकरांचा एक जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर कराडमध्ये कोल्हापूरकरांच्या मागणीला पाठिंबा देत सह्यांची मोहीम राबविण्यात आली. यावेळी कराडकरांचा मोठा प्रतिसाद या मोहिमेला मिळाला.