१२ खेळाडूंना मिळणार २४ लाख रुपये; आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना अर्थसहाय्य

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये निवड झालेल्या राज्यातील १२ खेळाडूंना प्रशिक्षण आणि स्पर्धेच्या अनुषंगाने आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने २४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यानुसार प्रत्येक खेळाडूला दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
१२ खेळाडूंना मिळणार २४ लाख रुपये; आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना अर्थसहाय्य
१२ खेळाडूंना मिळणार २४ लाख रुपये; आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना अर्थसहाय्य'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये निवड झालेल्या राज्यातील १२ खेळाडूंना प्रशिक्षण आणि स्पर्धेच्या अनुषंगाने आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने २४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यानुसार प्रत्येक खेळाडूला दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

राज्याच्या क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना आर्थिक मदत करणे, या उद्देशाने राज्य क्रीडा विकास निधीला अंशदान देण्याची योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत २०२४-२५ आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षांतील पात्र खेळाडूंच्या प्रस्तावांची तपासणी करून क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाने शिफारशींसह प्रस्ताव सादर केला होता. उपमुख्यमंत्री तथा क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला होता.

पॅरा बॅडमिंटनपटूंचा समावेश

अर्थसहाय्यासाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये जिम्नॅस्टिक्समधील सोहम संजोग ढोले, पॅरा बॅडमिंटनमधील आरती ज्ञानोबा पाटील, निलेश बाळू गायकवाड, प्रेम कुमार आले, यशोधन विजयकुमार रावणकुळे आणि लताताई परमेश्वर उमरेकर यांचा समावेश आहे. अश्वारोहणातील हृदय विपुल छेडा, तिरंदाजीतील रेयान तौफीक सिद्दीकी आणि वैष्णवी बाबाराव पवार, पॅरा ॲथलेटिक्समधील दिलीप महादू गावित, पॅरा सायकलिंगमधील विशाल सुरेश शेलार आणि व्हॉलीबॉलमधील माहेश्वरी प्रशांत भावस्कर यांनाही प्रत्येकी दोन लाख रुपये मिळणार आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in