महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

जागतिक आर्थिक परिषदेची दावोसमधील वार्षिक बैठक यंदा महाराष्ट्रासाठी अतिशय लाभदायक आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त ७ ते १० लाख कोटींच्या गुंतवणुकीबाबत प्राथमिक बोलणी झाली असून हे करारही येत्या एक-दोन महिन्यात प्रत्यक्षात उतरणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.
महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीPhoto : X (Devendra Fadanvis)
Published on

मुंबई : जागतिक आर्थिक परिषदेची दावोसमधील वार्षिक बैठक यंदा महाराष्ट्रासाठी अतिशय लाभदायक आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त ७ ते १० लाख कोटींच्या गुंतवणुकीबाबत प्राथमिक बोलणी झाली असून हे करारही येत्या एक-दोन महिन्यात प्रत्यक्षात उतरणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. मुंबईला येत्या काळात आपण सर्क्युलर इकॉनॉमीचे शहर करणार असून त्यामुळे मुंबईतील घनकचरा आणि सांडपाण्याचे रूपांतर संपत्तीत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दावोस दौऱ्यात सहभागी झाले आहे. १७ जानेवारीपासून सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत आर्थिक गुंतवणुकीबाबत राज्य सरकारने विविध आंतरराष्ट्रीय उद्योग समूहांशी सामंजस्य करार केले. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी गुरुवारी दावोस येथून झूमच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्योग, सेवा, शेती अशा सर्वच क्षेत्रात गुंतवणूक होणार आहे. यातील ८३ टक्के करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक आहे. दरम्यान, तिसऱ्या मुंबईत टाटा सन्स तिथे ११ बिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. भविष्यातले शहर म्हणून हे शहर ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबईमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी

मुंबईमध्ये येत्या काळात सर्क्युलर इकॉनॉमी उभारणार आहोत. मुंबईतील पाणी, हवेची शुद्धता वाढली पाहिजे. त्यासाठी वेस्ट हे वेल्थमध्ये रूपांतरित झाले पाहिजे. मुंबई महापालिका त्यासाठी पुढाकार घेऊन तर काम करेलच, पण त्यात खासगी क्षेत्रातूनही गुंतवणूक येईल. हाच प्रयोग पुणे, नागपूरमध्येही राबवण्यात येईल. यामुळे मुंबईसह इतर शहरांचा चेहरामोहराच बदलून जाईल, असा दावा फडणवीस यांनी केला.

लोढांच्या करारांमुळे राज्याला फायदा

मंत्री मंगलप्रभात लोढांच्या मुलासोबत दावोसमध्ये का करार केला? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अभिषेक लोढा हे देशातील प्रथितयश उद्योगपती आहेत. त्यांनी केलेल्या करारांमुळे महाराष्ट्राला फायदा होणार आहे. जगातील चार मोठ्या कंपन्या डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक करत आहेत. डेटा सेंटर गुंतवणुकीत मुंबई त्यामुळे पहिल्या क्रमांकावर येईल. यात ८० टक्के परदेशी गुंतवणूक आहे. २०२१ मध्ये आलेल्यांनी ७० ते ८० हजार कोटींचे करार केले होते. आता ३० लाख कोटींचे करार झाले आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

logo
marathi.freepressjournal.in