Farmers Die By Suicide In Chandrapur : धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात मागील सात महिन्यात ७३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

गेल्या पाच वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात ४४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Farmers Die By Suicide In Chandrapur : धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात मागील सात महिन्यात ७३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Published on

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी ते जुलै या काळात चंद्रपूर जिल्ह्यातून तब्बल ७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात मागील महिन्यात १३ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात ४४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांचा समावेश असलेल्या समितीने २००१ ते २०२२ या काळात आत्महत्या केलेल्या ७४५ शेतकऱ्यांना शासकीय नुकसान भरपाईसाठी तर ३२९ मयत शेतकऱ्यांना अपात्र घोषित केले होते, असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

जिल्हा प्रशासनाने मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे प्रस्ताव पाठवला असून डिसेंबर २०२२ पासून ४८ प्रकरणे प्रलंबित आहेत. जिल्हाधिकार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना १ लाख रुपये भरपाई रक्कम देण्याासाठी २००६ मध्ये अद्यतनिक केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करत आहोत.

सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत निश्चित निकषांवर आधारित नुकसान भरपाई देते. पीक नुकसान राष्ट्रीयकृत बँका/सहकारी बँका किंवा मान्यताप्राप्त सावकारांकडून कर्जाची परतफेट करण्यास असमर्थता आमि कर्जाची परतफेट करण्यात अपयशी अशा कारणांसाठी शेतकऱ्यांचे नातेवाईक १ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी पात्र असतील. त्यापैकी ३० हजार त्यांना सुपुर्द केले जातील तर उर्वरीत ७० हजार हे २००६ मध्ये जारी केलेल्या शासन निर्णयानुसार पाच वर्षांसाठी त्यांच्या खात्यात जमा केले जातील.

logo
marathi.freepressjournal.in