राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र; रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२ केंद्र

इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेल्या मतदान केंद्रावर शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी शॅडो मतदान केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.
राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र; रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२ केंद्र
Published on

मुंबई : इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेल्या मतदान केंद्रावर शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी शॅडो मतदान केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार असून सांगलीत फक्त १ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रक्रियेत इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण निर्माण होऊ नये यासाठी राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र असणार आहे. मात्र १२ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्राची गरज नाही. शॅडो मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा असणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in