

मुंबई : सातारा, सांगली आणि अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालाने राज्यातील स्थानिक राजकारणाची नवी सत्तासमीकरणे तयार केली आहेत.
अहिल्यानगरमध्ये भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तर सांगली काँग्रेसने सर्वाधिक सहा जागा जिंकून आघाडी मिळवली असून त्याला शरद पवार गटाने साथ दिल्यास आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा होईल. साताऱ्यात सत्ताधारीच परस्परांविरुद्ध लढल्याने तिथे कुणाची सत्ता येणार याबाबत उत्सुकता
सोलापुरात मोहिते-पाटलांसह अनेक दिग्गजांचे अर्ज बाद
सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांचे अर्ज बाद ठरले आहेत.
अहिल्यानगरमध्ये नवे सत्तासमीकरण
अहिल्यानगर जिल्हा बँकेत राधाकृष्ण विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास पॅनलने २१ पैकी १८ जागा जिंकल्या. तर, भाजपच्या राम शिंदेंच्या नेतृत्वाखालील एका उमेदवाराने विजय मिळवला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेही निवडून आले आहेत. शिवाय एका अपक्ष उमेदवारानेही बाजी मारली आहे. या निवडणुकीत ११ जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले होते.
सांगली संख्याबळ
काँग्रेस – ६
राष्ट्रवादी शरद पवार – ५
भाजप – ५
शिवसेना शिंदे गट – ३
राष्ट्रवादी अजित पवार - २