मुंबई : विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७९५ कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील ४० हजार होमगार्ड्सना याचा लाभ होणार आहे.
सध्या या होमगार्ड्सना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज ५७० रुपये मिळतात. ते आता एक हजार ८३ रुपये करण्यात येईल. याशिवाय उपहार भत्ता दोनशे रुपये, कवायत भत्ता १८० रुपये, खिसा भत्ता १०० रुपये, भोजन भत्ता २५० रुपये अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. यासाठी येणाऱ्या सुमारे ७९५ कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.