ॲप-आधारित टॅक्सींना नवे नियम; जादा भाडे आकारणीवर मर्यादा

ग्राहकांचे हित जपण्यासाठी आणि भाडे आकारणी पारदर्शक ठेवण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभागाने उबर, ओला आणि रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित टॅक्सी सेवांवर सर्ज प्राइसिंग (जादा भाडे आकारणी) मर्यादा लागू केली आहे.
ॲप-आधारित टॅक्सींना नवे नियम; जादा भाडे आकारणीवर मर्यादा
Published on

कमल मिश्रा / मुंबई

ग्राहकांचे हित जपण्यासाठी आणि भाडे आकारणी पारदर्शक ठेवण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभागाने उबर, ओला आणि रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित टॅक्सी सेवांवर सर्ज प्राइसिंग (जादा भाडे आकारणी) मर्यादा लागू केली आहे. मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, उत्सव, गर्दीची वेळ किंवा आपत्कालीन परिस्थितीतही या कंपन्यांना मूळ भाड्याच्या १.५ पटपेक्षा जास्त शुल्क आकारण्यास मनाई असेल.

मुंबई आरटीओकडून उबर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि., ANI टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (ओला) आणि रॉपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. (रॅपिडो) यांसारख्या प्रमुख ॲग्रिगेटर्सना दिलेल्या सूचनांनुसार कठोर भाडेनियम लागू करण्यात आले आहेत.

  • सर्ज प्राइसिंग कॅप : मागणी जास्त असताना देखील प्रवासाचे भाडे हे मूळ भाड्याच्या १.५ पटांपेक्षा जास्त आकारता येणार नाही.

  • सवलत मर्यादा : गर्दी नसलेल्या वेळेत आता बेस फेअरच्या २५% पर्यंतच सवलत देण्याची परवानगी असेल.

  • चालक हक्कांचे संरक्षण : प्रत्येक प्रवासाच्या एकूण भाड्यातून किमान ८०% रक्कम ड्रायव्हरकडे जाणे अनिवार्य करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in