महाराष्ट्राने जागवले अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचे स्नेहबंध; लोणावळ्याजवळ १०० घरे बांधण्यास केली होती मदत

मेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जीम कार्टर ज्यांना त्याच्या अध्यक्षीय कार्याकाळानंतर नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, त्यांचे रविवारी दीर्घ आजारामुळे निधन झाले. ते १०० वर्षांचे होते.
महाराष्ट्राने जागवले अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचे स्नेहबंध; लोणावळ्याजवळ १०० घरे बांधण्यास केली होती मदत
Published on

मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर ज्यांना त्याच्या अध्यक्षीय कार्याकाळानंतर नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, त्यांचे रविवारी दीर्घ आजारामुळे निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध माजी अध्यक्ष असलेले कार्टर यांचे महाराष्ट्राशी आणि विशेषत: मुंबईशी राजकारणापलीकडचे नाते होते. जॉर्जियाचा शेंगदाण्याचा शेतकरी असलेल्या कार्टर यांचे लोणावळ्यातील गरीब कुटुंबीयांशी नाते जुळले ते एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून.

ही आठवण आहे २००६ मधली. मुंबईपासून सुमारे ८० किमी अंतरावर असलेल्या लोणावळ्याजवळ १०० गरीब कुटुंबांसाठी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर एक देवदूत ठरले, कारण कार्टर यांनी २००६ मध्ये या गरीब कुटुंबीयांना घरे बांधून देण्यासाठी मदत केली होती.

त्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात, अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर आणि त्यांची पत्नी रोझलिन, लोणावळ्याजवळील पाटण गावात घरे बांधण्यासाठी एक आठवडा काम करत होते. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह सुमारे २ हजार आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक स्वयंसेवक त्यांच्यासोबत या कार्यात सहभागी होते.

या स्वयंसेवकांमध्ये सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट आणि बॉलिवूडचा अभिनेता जॉन अब्राहम यांचा समावेश होता. ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने येथील गरीब कुटुंबांसाठी ही घरे बांधण्यात आली होती. कार्टर यांनी त्यांच्या कारपेंट्री कौशल्याचा वापर करून या स्वयंसेवी संस्थेचा प्रोफाइल वाढवण्यासाठी आणि निधी गोळा करण्यासाठी मदत केली होती.

१९८४ पासून, कार्टर हे दरवर्षी आपला एक आठवड्याचा वेळ आणि आपले बांधकाम कौशल्य दान स्वरूपात हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटीसाठी देत आले होते.

कार्टर यांचा ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी’सोबतचा संबंध १९८४ मध्ये सुरू झाला. त्यांनी न्यू यॉर्कमधील एका इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी आपले कारपेंट्री कौशल्य आणि श्रमदान केले होते.

हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी ही संस्था अमेरिकेतील जॉर्जियामधील अमेरिकस शहरात सुरू झाली होती. ही संस्था घरमालकांना त्यांचे घर बांधून देण्यास मदत करीत असे.

हॅबिटॅटचे घर हे दान म्हणून दिले जात नाही तर ती निवडक लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. खास करून अशा लोकांची ज्यांच्यामध्ये कमी व्याज दराने कर्ज परतफेड करण्याची क्षमता असते. तसेच त्यांच्याकडून किती श्रमदान घेतले जाऊ शकते यावर ही निवड अवलंबून असते.

जिमी कार्टर यांच्या आईचे मुंबई वास्तव्य

१९८० मध्ये, अमेरिकेचे अध्यक्षपद सोडल्यानंतर, कार्टर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याची आई लिलियन या ६७ वर्षांच्या असताना त्यांनी पीस कॉर्प्सशी स्वत:ला जाडून घेतले होते आणि मुंबईजवळील एक कुष्ठरोग वसाहतीत तिने काम केले होते. "ती बॉम्बे जवळ एका लहान गावात होती, त्याचे नाव विक्रोळी होते," माजी अध्यक्षांनी आठवून सांगितले. त्याच विक्रोळीने आता मुंबईतील मध्यवर्ती उपनगराचे रूप घेतले आहे.

logo
marathi.freepressjournal.in