जरांगेंचे ३ नोव्हेंबरला ठरणार; उमेदवार, मतदारसंघ जाहीर करणार

आम्ही उमेदवारीवरून भांडणार नाही, सगळ्यांना मोकळे सोडणार आहोत. मात्र आम्हाला त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
जरांगेंचे ३ नोव्हेंबरला ठरणार; उमेदवार, मतदारसंघ जाहीर करणार
Published on

जालना : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी ३ नोव्हेंबरला उमेदवार आणि त्यांच्या मतदारसंघांची घोषणा करणार असल्याचे गुरुवारी सांगितले. आम्ही उमेदवारीवरून भांडणार नाही, सगळ्यांना मोकळे सोडणार आहोत. मात्र आम्हाला त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

ज्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यातील एकच उमेदवार रिंगणात राहील, उर्वरित इच्छुकांनी अर्ज मागे घ्यावयाचे आहेत, असेही ते म्हणाले. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी खूप शिकविले, असा टोलाही त्यांनी लगावला.

आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला समर्थन द्यावे, असे आवाहन जरांगे यांनी यावेळी दलित आणि मुस्लीम समाजातील नेत्यांना केले. त्याचप्रमाणे मराठा समाजानेही दलित आणि मुस्लीम समाजाला समर्थन द्यावे. प्रस्थापितांना आव्हान देण्यासाठी आणि आपल्या समाजाविरुद्ध काम करणाऱ्यांचा पराभव करण्यासाठी आपले ऐक्य गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

मुस्लीम समाजातील एक नेते सज्जाद नोमाणी यांनी भाजप हा धार्मिक आधारावर देशात फूट पाडत असल्याचा आरोप केला आणि मतविभागणी टाळण्यासाठी संयुक्त आघाडी गरजेची असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीसाठी - किमान समान कार्यक्रम जाहीर करण्याचे आम्ही ठरविले - आहे, आपले ऐक्य केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी उदाहरण आहे. या भूमिकेला दलित नेते राजरत्न आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनीही पाठिंबा दिला.

घनसावंगीत ओबीसी मते निर्णायक

राज्याच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघात ओबीसी मते निर्णाय ठरणार आहेत. या मतदारसंघात अंतरवाली सराटीअसून मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा हा केंद्रबिंदू आहे.

किमान समान कार्यक्रम ठरविणार

दलित आणि मुस्लिम समाजातील अनेक नेत्यांनी गुरुवारी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली आणि विधानसभा निवडणुकीसाठी किमान समान कार्यक्रम तयार करण्यास बांधील असल्याची जरांगे यांना ग्वाही दिली.

logo
marathi.freepressjournal.in