महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येणार, ८ ते १४ नोव्हेंबरदरम्यान सभांचा धडाका

राज्यात यंदाची विधानसभा निवडणूक ‘न भूतो’ अशी होणार आहे. चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत महायुती व मविआमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : राज्यात यंदाची विधानसभा निवडणूक ‘न भूतो’ अशी होणार आहे. चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत महायुती व मविआमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या विधानसभेच्या प्रचारासाठी महायुतीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारात उतरणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या ८ ते १४ नोव्हेंबरदरम्यान राज्याच्या विविध भागात प्रचारसभा होणार आहेत.

राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान आहे. आता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी यंदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (उबाठा), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या पक्षांसोबतच मनसे, वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत उतरली आहे. या निवडणुकीत महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येणार आहेत. महाराष्ट्रात ८ दिवस मोदी यांच्या सभा होणार आहेत. येत्या ८ ते १४ नोव्हेंबरदरम्यान पंतप्रधान महाराष्ट्रात असणार आहेत. या काळात भाजपबरोबरच महायुतीतील उमेदवारांसाठी ते सभा घेणार आहेत.

महायुतीकडून १८२ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात भाजपकडून ९९, शिवसेना शिंदे गटाने ४५ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने ३८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

१४ नोव्हेंबरपासून मोदी परदेश दौऱ्यावर

पंतप्रधान १४ नोव्हेंबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे कमी कालावधीत मोदींच्या जास्तीत जास्त सभा राज्यात होतील, असे वेळापत्रक आखले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in