मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाडा; भुजबळांच्या बालेकिल्ल्यातून मनोज जरांगे यांचे आवाहन

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात सभा घेऊन मराठा समाजाला विरोध करणाऱ्या दोघांना निवडणुकीत पाडण्याचे आवाहन केले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

नाशिक : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात सभा घेऊन मराठा समाजाला विरोध करणाऱ्या दोघांना निवडणुकीत पाडण्याचे आवाहन केले. येवल्यात ही माझी सांत्वनपर भेट आहे. कोणाला पाडा, हे सांगायला मी आलो नाही, मात्र मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला पाडा. आता कोणी पडत असेल तर त्यात माझा काय दोष, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी लक्ष्य केले.

"येवल्यात विशेष असे काहीच नाही. हा मतदारसंघ काही राज्याबाहेर नाही. माझ्या पोटात एक आणि ओठात एक असे नाही. मी ठरवले की डायरेक्ट कार्यक्रम करतो. आता एक माईक जुना झाला म्हणून दुसरा हातात घेतला. पण तो ही सारखा-सारखा बिघडत आहे," अशा शब्दांत त्यांनी भुजबळांवर प्रहार केला.

"माझा मराठा समाज बुद्धिजीवी आहे. तो थोडाही संभ्रमात राहत नाही. मराठा समाज बरोबर पाडणार आहे. आता तुम्ही कोणत्याही पक्षात फिरा. परंतु मतदान करताना लेकरांच्या आणि जातीच्या बाजूने पडले पाहिजे, हे लक्षात ठेवा. मतदान केंद्रावर जाताना फक्त जात पाहून मतदान करा. आपल्याला जात मोठी केल्याशिवाय आपली लेकरे मोठी होणार नाहीत. त्याशिवाय समाज घडवणार नाही," असे आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केले.

logo
marathi.freepressjournal.in