विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज थांबला. यंदाची ही निवडणूक एकापक्षा विरोधात दुसरा पक्ष अशी नसून तीन पक्षांची महायुती विरोधात तीन पक्षांची महाआघाडी अशी लढवली जात आहे. अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर न केल्याने गोंधळलेले कार्यकर्ते आणि विरोधी पक्ष हे संभ्रमात होते. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी चोपडा मतदारसंघात ठाकरे गटाने आपला उमेदवार बदलला. प्रत्येक पक्षाने तुल्यबळ उमेदवार दिल्याने यंदा निवडणुकीत रंगत आली आहे पण सर्वच पक्षांना अपक्षांमुळे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे.
२०१९ च्या निवडणुकीत भाजपची बंडखोरी ही शिवसेनेला घातक ठरली होती. सेनेचे उमेदवार पडले होते. यावेळी शिंदे गटामागे भाजपा ठाम उभा आहे . महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणायचे हे भाजपाचे उददीष्ट आहे . ही जबाबदारी भाजपाचे संकट मोचक गिरीश महाजन , अनिल भाईदास पाटील आणि शिंदेसेनेची मुलूखमैदान तोफ गुलाबराव पाटील या तीन मंत्रीगणाकडे मुख्यमंत्री यांनी सोपवली आहे .
यंदाच्या निवडणुकीत जिल्हयातील अकरा मतदारसंघात १३९ उमेदवार उभे असून त्यात ८७ उमेदवार हे अपक्ष आहेत . महायुती आणि महाआघाडी अशी लढत असली तरी या युती आणि आघाडीच्या उमेदवारांना अपक्षांकडून धोका आहे .यंदा भाजपाने ५ ,शिंदे गटाने ५ तर अजित पवार गटाने १ असे अकरा उमेदवार उभे केले तर आघाडीकडून ठाकरे गटाने ४ शरद पवार गआने ४ व काँग्रेसने तीन उमेदवार उभे केले आहेत .
जळगाव शहर यंदा तिस-यांदा राजूमामा हे भाजपाकडून निवडणूक रिंगणात आहेत. जळगाव शहर मतदारसंघात २९ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरा सामना हा भाजपाचे विदयमान आमदार सुरेश भोळे आणि ठाकरे गटाच्याच्या जयश्री महाजन यात आहे . भाजपाचे जुने कार्यकर्ते माजी उपमहापौर डॉ . अश्विन सोनवणे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत .सोनवणे हे कोळी समाजाचे असून ते कोळी समाजाची मते मिळवतील , याचा फटका हा राजूमामा यांना बसेल. शिवसेना दुभंगल्यानंतर जिल्हयात ठाकरे गट हा खिळखिळा झाला. संघटन , कार्यकत्यांची फळी मजबूत राहीली नाही . याचा फटका जयश्री महाजनांना बसू शकतो. एकंदरीत ही लढत चुरशीची असली तरी भाजपाचे पारडे जड आहे .
जळगाव ग्रामीण मतदारसंघात .शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे १९९९ पासून निवडून येत आहेत अपवाद २००९ चा ...गुलाबराव पाटील यांचे पारंपारिक स्पर्धक म्हणून देवकरांकडे पाहिले जाते. देवकरांकडे आक्रमकता नाही तसेच त्यांनी मतदारसंधाशी फारसा नियमित संपर्क देखील ठेवला नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे . राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पक्षाचे मजबूत केडर देवकरांच्या पाठीशी नाही . यंदा देखील या दोन गुलाबरावात यात लढत होत असून गुलाबराव पाटील हे शिवसेना ठाकरे गटातून ते बाहेर पडून शिंदे गटात सामील झाल्याने ठाकरे गटाचा विशेष रोष त्यांच्यावर आहे . शिरीष चौधरींचे सुपुत्र धनंजय चौधरी हे काँग्रेसकडून निवडणुक लढवत असून त्यांचे विरोधात माजी खासदार हरीभाउु जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे हे आहेत .
एरंडोल मतदारसंघात आज शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील हे प्रतिनिधीत्व करत असले तरी त्यांनी आपले सुपुत्र अमाल पाटील यांना उमेदवारी दिली आहे या मतदारसंघातून ठाकरे गटाचे डॉ हर्षल माने यांनी उमेदवारी मागितली होती मात्र राष्ट्रवादीला ही जागा सुटलयाने डॉ. हर्षल माने हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत . भाजपाचे माजी खासदार ए. टी . नाना पाटील हे अपक्ष म्हणून निवडणुक लढवत आहेत या शिवाय भागवत महाजन माळी समाजाचे नेते अपक्ष म्हणून निवडणुक रिंगणात असल्याने येथे निवडणुक अत्यंत चुरशीची होत असून खरा सामना अपक्ष बंडखोर ए टी पाटील विरोधी सतीश पाटील असा राहणार आहे
जामनेर मतदारसंघ १९९५ मध्ये भाजपाचे गिरीश महाजन यांनी काबीज करून सलग सहा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे . यावेळी गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपाचेच जुने कार्यकर्ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे उभे आहेत . गिरीश महाजन हे जरांगेंच्या हिटलिस्टवर असून त्यांचा काही प्रभाव पडतो का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे .
मुक्ताई नगर मतदारसंघ हा राज्याचे लक्ष लागलेला हा मतदारसंघ . भाजपाचे नेते एकनाथ खडसे या मतदारसंघातून सातत्याने सहा वेळा या मतदारसंधातून निवडून आले.आज आक्रमक स्वभावाचे चंद्रकांत पाटील हे शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत . रोहिणी खडसे या एकनाथ खडसेंसोबत शरद पवार गटात गेल्या आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत . रोहिणी खडसेंकडे कार्यकत्यांची मजबूत फळी आहे . या निवडणुकीत राहिणीचा प्रचार वडील एकनाथ करीत आहेत तर भावजयी रक्षा खडसे मात्र महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा प्रचार करतांना दिसतात .
पाचोरा मतदार संघात शिंदेगटात गेलेले आमदार किशोर पाटील पराभूत व्हावेत म्हणून ठाकरे गटाचा आटापीटा सुरू असून त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने किशोर पाटील यांची बहिण वैशाली सुर्यवंशी यांना उभे केले आहे . यावेळी दिलीप वाघांची व अमोल शिंदेंची बंडखोरी शिंदे गट आणि ठाकरे गटाला महागात पडू शकते.
चाळीसगाव मतदारसंघ
भाजपाचे अत्यंत उच्चशिक्षित माजी खासदार उन्मेष पाटील यांना पक्षाने लोकसभेचे तिकीट कापल्याने त्यांनी भाजपातून ठाकरे गटात केलेल्या प्रवेशाने आणि नंतर स्वत:ला उध्दव ठाकरे यांनी तिकीट देउु केले असता नाकारणारे उन्मेष पाटील विशेष चर्चेत आले . आता ठाकरे गटात आल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी उन्मेष पाटील यांना विधानसभेचे तिकीट दिले असून त्यांना भाजपाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्याशी मुकाबला करायचा आहे . आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे चाळीसगावला हा सामना चांगलाच रंगत असून जिल्हयाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे .