मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारराजाला आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांनी आपले जाहीरनामे, वचननामे यांच्या माध्यमातून आश्वासने दिली आहेत. त्यानुसार मविआ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, महायुती, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षांच्या जाहीरनाम्यांचा घेतलेला हा आढावा.
अजित पवारांचे घोषणापत्र
लाडक्या बहिणीला आता २१०० रुपये देणार
शेतकरी कर्जमाफी
भात शेतकऱ्यांसाठी २५ हजार प्रति हेक्टर बोनस
अडीच लाख नोकऱ्या
ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम
अंगणवाडी आणि आशा वर्कर कर्मचाऱ्यांना १५ हजार मासिक वेतन
सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देत वीजबिल ३० टक्के कमी
ठाकरे शिवसेनेचा वचननामा
मुंबई व महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण ठरवणार
आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आणणार
मुंबई, महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगार
जागतिक दर्जाचे आर्थिक व औद्योगिक केंद्र उभारणार
बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार
विनाशकारी प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरणस्नेही उद्योगांना प्रोत्साहन देणार
महायुतीची १० वचने
लाडक्या बहिणींना १,५०० ऐवजी २१०० रुपये
महिला सुरक्षेसाठी २५,००० महिलांचा पोलीस दलात समावेश
शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १५ हजार रुपये अनुदान
प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन
वृद्ध पेन्शनधारकांना १५०० ऐवजी २१०० रु.
२५ लाख रोजगार निर्मिती
१० लाख विद्यार्थ्यांना १०,००० रुपये विद्यावेतन
४५,००० गावांत पांदण रस्ते बांधणार
अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५ हजार रुपयांचे सुरक्षा कवच
वीज बिलात ३० टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन
मविआच्या योजना
महिलांना महिना ३ हजार रुपये
युवकांना महिना ४ हजार
५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार
२५ लाखांपर्यंत आरोग्य विमा
नियमीत कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्ज माफी
कृषी समृद्धी योजना
जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार