राज्यात भरारी पथके तैनात, राज्य निवडणूक आयोगाची माहिती; ६ लाख ६२ हजार पोस्टर, बॅनर हटवले

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत मतदारांना प्रभावित करणाऱ्या योजना, पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करणे नियमबाह्य आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकारांवर देखरेखीसाठी राज्यात भरारी पथके तैनात करण्यात आले आहे.

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर `सी व्हिजल ॲप`वर प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार ६ लाख ६२ हजार पोस्टर, बॅनर तसेच भिंतीवरील जाहिराती हटवण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत मतदारांना प्रभावित करणाऱ्या योजना, पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करणे नियमबाह्य आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्यात विशेष पथक तैनात करण्यात आली आहेत. या पथकांनी केलेल्या कारवाईत मद्य, रोख, अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. तसेच भिंतीवरील चित्र, भित्तीपत्रके हटवण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in