महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, महापुरूषांचा अवमान... कसा होता हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस?

हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस हा गदारोळाचा राहिला. पण, काय होते दिवसभराचे मुद्दे जाणून घेऊ थोडक्यात (Maharashtra Assembly Winter Session)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, महापुरूषांचा अवमान... कसा होता हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस?
Published on

नागपूरमध्ये आज हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. (Maharashtra Assembly Winter Session) पहिल्याच दिवशी अधिवेशनाची सुरुवात ही अपेक्षितपणे वादळी झाली. विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला अनेक मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशी विरोधकांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचा होणारा अवमान, तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून टीका केली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गदारोळ झाला आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून शिंदे गटाने सुषमा अंधारे यांच्याविरोधात घोषणा दिल्या. त्यांनी काही दिवसांपूर्वी संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर वारकरी संप्रदायाकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. तसेच, अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली. तसेच, विधानभवनातील शिवसेना कार्यालय कोणत्या गटाकडे जाणार? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दाही उचलण्यात आला. तर, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेननंतर पहिल्यांदाच विधान भवन परिसरात शाईचे पेन घेऊन जाण्यास प्रतिंबध घालण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून शाई पेनवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.

logo
marathi.freepressjournal.in