मुंबई : राज्यातील एकूण १,८०० भजन मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपये एका महिन्यात वितरित केले जाणार असून, यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने ४.५ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार, ही रक्कम हार्मोनियम, मृदंग, पखवाज, वीणा आदी वाद्ये खरेदी करण्यासाठी वापरता येईल.
भजन मंडळांना दिली जाणारी ही रक्कम तातडीने वितरित करण्याची जबाबदारी सांस्कृतिक कार्य संचालक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच त्यांनी एक महिन्यातच या निधीचा उपयोग प्रमाणपत्र आणि पालन अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महानगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असताना, निधी वितरणाच्या प्रक्रियेत कोणताही नियमभंग होऊ नये, याची खात्री करण्याचे आदेशही संचालकांना देण्यात आले आहेत.