राज्यात फक्त ८ दिवसांचा रक्तसाठा; राज्य रक्त संक्रमण परिषदेची माहिती

रक्तदान हे जीवनदान आहे असे आपण म्हणतो. पण, तरीही रक्तदान करण्यासाठी पुढे येण्यास बहुतांशी जण कचरत असतात. अपघात किंवा कोणत्याही वैद्यकीय आणिबाणीच्या काळात रक्ताची गरज भासते. सध्या राज्यात रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे.
राज्यात फक्त ८ दिवसांचा रक्तसाठा; राज्य रक्त संक्रमण परिषदेची माहिती
राज्यात फक्त ८ दिवसांचा रक्तसाठा; राज्य रक्त संक्रमण परिषदेची माहितीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : रक्तदान हे जीवनदान आहे असे आपण म्हणतो. पण, तरीही रक्तदान करण्यासाठी पुढे येण्यास बहुतांशी जण कचरत असतात. अपघात किंवा कोणत्याही वैद्यकीय आणिबाणीच्या काळात रक्ताची गरज भासते. सध्या राज्यात रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे.

मुंबईत ४,३३७ युनिट तर महाराष्ट्रात ३८ हजार ३५५ युनिट रक्त उपलब्ध आहे. मुंबईतील रक्तसाठा पाच दिवस तर महाराष्ट्रातील रक्तसाठा आठ दिवस पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. तसेच थॅलेसिमिया किंवा अन्य रक्तांच्या आजारात रुग्णांना सातत्याने रक्त चढवावे लागते.

मुंबईसह राज्यभरात राज्य रक्त संक्रमण परिषद मान्यताप्राप्त रक्तपेढ्या, पालिका, सामाजिक संस्था, मंडळे यांच्याकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून गरजूंना रक्ताचा पुरवठा करण्यात येतो.

मुंबईत दररोज १ हजार युनिट तर महाराष्ट्रात पाच हजार युनिट रक्ताची गरज भासते. मात्र, गेल्या काही वर्षांत रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. गरजूंना रक्त मिळावे यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे.

रक्तदात्यांनो रक्तदानासाठी पुढे या!

मुंबईत दररोज साधारण एक हजार युनिटपर्यंत रक्त रुग्णालयांमध्ये लागते व सध्या पाच दिवस पुरेल इतका रक्तसाठा असला तरी हा रक्ताचा तुटवडा मानण्यात येत आहे. रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे छोट्या रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत तसेच रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन परिषदेने केले आहे.

  • राज्यात रक्तपेढी संख्या - ४१५

  • मुंबईत रक्तपेढी संख्या - ५९

  • महाराष्ट्रात उपलब्ध रक्तसाठा ३८,३५५ युनिट

  • राज्याला दररोज ५ युनिट रक्ताची गरज

  • मुंबईत ४,३३७ रक्तसाठा उपलब्ध

  • मुंबईला रोज १ हजार युनिट रक्ताची गरज

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in